शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलच्या खोलीत आढळला एकाच कुटुंबातील चौघांचा मृतदेह; २ जुळ्या मुलींचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 16:31 IST

मृत मैसूरला राहणारे होते. पती देवेंद्र, पत्नी निर्मला, ९ वर्षीय जुळ्या मुली चैत्रा आणि चैतन्या असं मृतकांची नावे आहेत.

मंगळुरू - कर्नाटकात मंगळुरू येथील लॉजमध्ये २ मुलांसह एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हॉटेलमधील या मृतदेहाबाबत तातडीने पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आर्थिक त्रासाला कंटाळून कुटुंबाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत मैसूरला राहणारे असून पती देवेंद्र, पत्नी निर्मला, ९ वर्षीय जुळ्या मुली चैत्रा आणि चैतन्या असं मृतकांची नावे आहेत. शुक्रवारी या कुटुंबाचे हॉटेलमधून चेकआऊट होणार होते परंतु कुटुंब बाहेर न आल्याने हॉटेल कर्मचारी दरवाजा ठोठवण्यासाठी गेला. मात्र दरवाजा उघडलाच नाही. तेव्हा कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता या प्रकरणाचा खुलासा झाला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी हॉटेलला पोहचले. 

आर्थिक त्रासाला कंटाळून आत्महत्या?पोलिसांनी म्हटलं की, आर्थिक त्रासाला कंटाळून या कुटुंबाने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. देवेंद्रने त्याच्या मुलींना विष पाजून मारले त्यानंतर पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि स्वत:नेही गळफास घेतला. २७ मार्चला या कुटुंबाने हॉटेलमध्ये भाड्याने रुम घेतली होती. ३० मार्चला ही रूम खाली करायची होती. तेव्हा हा प्रकार उघड झाला. देवेंद्रचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला तर पत्नी, जुळ्या मुलींचा मृतदेह बेडवर पडला होता. 

घटनास्थळी सापडली सुसाईड नोटपोलिसांनी तपास केला असता सुसाईड नोटही आढळली त्यात आर्थिक संकटात अडकल्यामुळे हे टोकाचं पाऊल उचललं असं म्हटलं आहे. तरीही पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.