शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दाऊद टोळीच्या परवेझ मेमनला अटक; टेरर फंडिंगप्रकरणी एटीएसची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 10:35 IST

परवेझ गेल्या अनेक वर्षांपासून दाऊद टोळीशी संबंधित असून, तो खंडणी व इतर गुन्ह्यांमध्ये फरार होता.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरविल्याच्या प्रकरणात दाऊद टोळीच्या परवेझ झुबेर मेमन (४७) याला महाराष्ट्र राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बेड्या ठोकल्या आहेत. अंधेरीतील राहत्या घरात मेमनवर अटकेची कारवाई करण्यात आली. 

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, दाऊदचा हस्तक अनिस इब्राहिम व त्याचे साथीदार बेकायदा कृत्यांमधून मिळालेल्या पैशांचा वापर भारतात दहशतवादी कारवायांसाठी करतात. याप्रकरणी एटीएसच्या काळा चौकीत २ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवत तपास सुरू करण्यात आला. याच टोळीमध्ये परवेझचाही सक्रिय सहभाग असल्याचे उघड होताच त्यालाही बुधवारी अंधेरीतून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तो अंमली पदार्थांचा धंदा करत असल्याचे निष्पन्न झाले. ड्रग्ज तस्करी आणि अन्य गैरकृत्यांतून मिळालेला पैसा भारतात दहशतवादी कृत्य घडवून आणण्यासाठी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी संघटना व हस्तकांना पुरवित असल्याचे स्पष्ट होताच परवेझवर अटकेची कारवाई करण्यात आली. 

परवेझ गेल्या अनेक वर्षांपासून दाऊद टोळीशी संबंधित असून, तो खंडणी व इतर गुन्ह्यांमध्ये फरार होता. त्यानंतर तो दुबई येथे पळून गेला. दुबईमध्ये राहून त्याने आपल्या बेकायदा व्यवसायात जम बसविला. तो सध्या अनिस इब्राहिम याच्यासोबत देशविरोधी कटामध्ये सहभागी असून, याप्रकरणी अधिक  तपास सुरू असल्याचे एटीएसने सांगितले.