शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन कर्ज फेडण्यासाठी नोकराकडून दागिन्यांवर डल्ला

By प्रशांत माने | Updated: September 1, 2023 14:52 IST

ज्वेलर्स शॉपमध्ये चोरी, अवघ्या तीन तासात आरोपी अटक

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: ऑनलाईन घेतलेले ५० हजारांचे कर्ज फेडण्यासाठी ज्वेलर्समध्ये काम करणा-या नोकराने मालकाने होलमार्क करण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरूवारी घडली होती. दरम्यान रामनगर पोलिसांनी या गुन्हयाचा कसोशीने तपास करीत पसार झालेल्या नोकराला ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून अटक केली. त्याच्याकडून १२ लाख ७२ हजाराचे दागिने जप्त केले आहेत. विक्रम गोपाळ रावल (वय २८ ) रा.डोंबिवली असे अटक आरोपीचे नाव आहे.

पुर्वेकडील आगरकररोड परिसरात राहणारे बसंतीलाल चपलोत यांचे नेहरू रोड याठिकाणी प्रगती ज्वेलर्स शॉप आहे. त्यांच्या दुकानात गेले वर्षभरापासून काम करणारा विक्रम रावल याच्याकडे मालक बसंतीलाल यांनी १२ लाख ७२ हजारांचे सोन्याचे दागिने होलमार्क करण्यासाठी दिले होते. संध्याकाळी पाच वाजता दिलेले दागिने घेऊन होलमार्क करण्यासाठी दुकानाबाहेर पडलेला विक्रम बराच वेळ लोटूनही दुकानात परतलाच नाही. बसंतीलाल यांनी मोबाईल केला असता त्याचा फोन स्वीच ऑफ येत होता. अखेर संशयावरून त्यांनी रामनगर पोलिस ठाणे गाठले आणि याबाबतची तक्रार दिली. रामनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, पोलिस उपनिरिक्षक अजिंक्य धोंडे, पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे, निसार पिंजारी आणि अन्य पोलिस कर्मचा-यांचे पथक गुन्हयाच्या तपासकामी नेमले होते. पथकाने सीसीटिव्ही आणि तांत्रिक मदतीच्या आधारे त्याच्या मागावर जात आरोपी विक्रमला ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून अवघ्या तीन तासात अटक केली.

कर्ज फेडण्यासाठी लावला होता तगादा

विक्रमने काही कामानिमित्त ५० हजार रूपये ऑनलाईन कर्ज घेतले होते. परंतू वेळेत तो फेडू न शकल्याने संबंधितांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला होता. अखेर या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने हे चोरीचे कृत्य केले अशी माहीती प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सानप यांनी सांगितले.

टॅग्स :Arrestअटक