शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
'महाभारत'मधील कर्णाचा अस्त, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
4
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
5
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
6
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
7
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
8
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
9
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
10
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
11
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
12
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
13
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
14
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
15
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
16
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
17
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
18
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
19
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
20
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा

गेन बिटकॉइनप्रकरणी २३ कोटींची क्रिप्टो करन्सी जप्त; ३४ लॅपटॉप, १२ मोबाइलही जप्त, सीबीआयची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 07:13 IST

कंपनीच्या गेन बिटकॉइन या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना महिन्याकाठी १० टक्क्यांचा परतावा देण्याचे आमिष देणारी योजना कंपनीने २०१७ मध्ये राबवली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तब्बल ६ हजार ६०६ कोटी रुपयांच्या गेन बिटकॉइनप्रकरणी सीबीआयने देशात ६० ठिकाणी केलेल्या छापेमारीदरम्यान २३ कोटी ९४ लाख रुपये मूल्याची क्रिप्टो करन्सी जप्त केली आहे. त्याचबरोबर आर्थिक व्यवहारांची १२१ कागदपत्रे, ३४ लॅपटॉप, हार्ड डिस्क, १२ मोबाइल, तसेच कंपनीच्या संचालकांमध्ये ई-मेलद्वारे झालेला संवाद आदी गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मुंबई, पुणे, नांदेड, कोल्हापूर, दिल्ली, झाशी, हुबळी, मोहाली, अशा एकूण ६० ठिकाणी छापेमारी केली होती.

जप्त केलेल्या कागदपत्रांची आणि ई-मेलची सध्या तपासणी सुरू आहे. हा घोटाळा नेमका कसा झाला आणि त्यातील पैशांची फिरवाफिरती कशी आणि कुठे झाली? तसेच परदेशात या पैशांद्वारे किती व्यवहार झाले? याचा उलगडा सीबीआय करणार आहे.

प्रकरण काय?मे. व्हेरिएबल टेक प्रा.लि. ने या बिटकॉइन कंपनीची स्थापना २०१५ मध्ये झाली होती. अमित भारद्वाज (आता हयात नाही), अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेन्द्र भारद्वाज हे या कंपनीचे मुख्याधिकारी होते.

कंपनीच्या गेन बिटकॉइन या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना महिन्याकाठी १० टक्क्यांचा परतावा देण्याचे आमिष देणारी योजना कंपनीने २०१७ मध्ये राबवली होती.देशातील हजारो गुंतवणूकदारांनी या आमिषाला बळी पड़त कंपनीच्या योजनेमध्ये गुंतवणूक केली होती. कंपनीच्या संचालकांनी देशभरातून गोळा झालेले ६ हजार ६०६ कोटी रुपये विविध मार्गानी स्वतःच्या खात्यामध्ये फिरवत गुंतवणूकदारांची फसवणूक केली.

परदेशातही कारवाईईडीचे अधिकारीदेखील या प्रकरणाचा तपास करत असून आतापर्यंत कंपनीची देशातील आणि परदेशातील १७२ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

टॅग्स :Bitcoinबिटकॉइनfraudधोकेबाजी