शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

क्रूरता! बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या 

By पूनम अपराज | Updated: November 30, 2020 21:49 IST

Rape And Murder : कोतवाली वृंदावनमध्ये वडिलांनी आठ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती.

ठळक मुद्देबलात्कारानंतर अमली पदार्थांचे व्यसन असलेल्या आरोपीने मुलीच्या तोंडात अंतर्वस्त्र कोंबून ठार मारले.

मथुरा जिल्ह्यात मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी वृंदावन पोलिस आणि एसओजीने उघडकीस आणली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. बलात्कारानंतर अमली पदार्थांचे व्यसन असलेल्या आरोपीने मुलीच्या तोंडात अंतर्वस्त्र कोंबून ठार मारले. कोतवाली वृंदावनमध्ये वडिलांनी आठ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृंदावन कोतवाली येथील रामनरेती चौकी भागात राहणारी आठ वर्षांची मुलगी, गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास नातेवाईक महिलेसह लाकडं गोळा करण्यासाठी शेजारील जंगलात गेली. ती तिथून बेपत्ता झाली होती. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी मुलीच्या शोधात शोध मोहीम राबविली, पण मुलगी काही सापडली नाही. या प्रकरणात वृंदावन कोतवाली पोलिसांनी मुलगी हरवल्याबाबत तक्रार नोंद केली होती. शुक्रवारी सकाळी मुलीचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत जंगलात आढळला. वृंदावन कोतवाल अनुज कुमार व एसओजी प्रभारी धीरज गौतम यांनी या बालिकेच्या हत्येचा तपास करत या गुन्ह्यात सहभागी झालेल्या महेश, रहिवासी तारौली सामौली कोतवाली छाता याला अटक केली आहे.

व्यसनाधीन आहे आरोपीसीओ सदर रमेश तिवारी म्हणाले की, अटक आरोपी हा व्यसनी आहे. आरोपीच्या शरीरावर आणि कपड्यांवर  मुलीवर बलात्कार केल्याचे पुरावे सापडले आहेत. आरोपीकडून जप्त केलेल्या रुमालावर रक्ताचे डागही सापडले आहेत. ज्याची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल आणि पुरावा म्हणून सादर केले जातील. आरोपीने मुलीचे अंतर्वस्त्र तिच्या तोंडात कोंबल्याने तिचा गुदमरून मृत्यू झाला.

 

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखूनPoliceपोलिसArrestअटकDrugsअमली पदार्थ