शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

निर्दयी! वडिलाचा राग काढला मुलीवर, शेजाऱ्यांच्या भांडणात चिमुकलीचा गळा चिरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 15:17 IST

बुधवारी संशयित आरोपी बाळू मोतीराम मारेगामा (३४) हा वादाचा वचपा काढण्यासाठी धारदार चाकू घेवून संतोष मुरखे यांच्या घरी आला.

ठळक मुद्देयाप्रकरणी संतोष नारायण मुरखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आराेपी बाळू मारेगामा याच्यावर भादंवि ३०२ कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास वडकी ठाणेदार करत आहे.

वडकी (यवतमाळ) : शेजाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होता. याचाच राग मनात धरून शेजारी राहात असलेल्या ३४ वर्षीय युवकाने वडिलाचा वचपा काढण्यासाठी अडीच वर्षाच्या मुलीचा गळा चिरून हत्या केली. ही थरारक घटना बुधवारी सायंकाळी राळेगाव तालुक्यातील खेमकुंड येथे घडली. देविका संतोष मुरखे (अडीच वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे. मुरखे व मारेगामा हे दोनही कुटुंब शेजारी राहतात. त्यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून वादावादी सुरू होती.

बुधवारी संशयित आरोपी बाळू मोतीराम मारेगामा (३४) हा वादाचा वचपा काढण्यासाठी धारदार चाकू घेवून संतोष मुरखे यांच्या घरी आला. त्यावेळी मुरखे दाम्पत्य शेतावर सोयाबीन काढण्यासाठी गेले हाेते. मुलगी देविका ही अंगणात खेळत होती. सुडाने पिसाळलेल्या बाळूने रागाच्या भरात चिमुकल्या देविकाचा गळा चिरला. हा प्रकार पाहून शेजाऱ्याने आरडाओरडा केल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती पोलीस पाटीलांनी वडकी ठाणेदार विनायक जाधव यांना दिली. मुरखे दाम्पत्यही शेतातून घरी आले. मुलीला गंभीर अवस्थेत पांढरकवडा येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.याप्रकरणी संतोष नारायण मुरखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आराेपी बाळू मारेगामा याच्यावर भादंवि ३०२ कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास वडकी ठाणेदार करत आहे.

टॅग्स :MurderखूनYavatmalयवतमाळPoliceपोलिसArrestअटक