शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : अनैतिक संबंधातून कामगार पतीची हत्या, गोणीत भरुन मृतदेह दिला होता फेकून, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 17:46 IST

तालुक्यातील कांबे परिसरात रस्त्यालगतच्या पुलाखाली मृतदेह गोणीत बांधून फेकण्यात आला होता

भिवंडी : तालुक्यातील कांबे परिसरात रस्त्यालगतच्या पुलाखाली मृतदेह गोणीत बांधून फेकलेल्या हत्येचा शोध लावत तीन आरोपींना अटक करण्यात निजामपुरा पोलिसांनी यश आले आहे अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

२० जानेवारी रोजी कांबे पॉवर हाऊस जुनांदुरखी रस्त्यावरील रुपाला ब्रिजचे खाली रक्ताने माखलेल्या एका गोणी मध्ये मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला या मयत इसमाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी पोलीस पथके बनवीत तपास सुरू केला होता. तपासात मृतदेहाच्या शर्टाच्या खिश्यात अर्धवट फाटलेले डॉक्टर प्रिस्किप्शन सापडल्यानंतर याआधारावरून तपासाची दिशा ठरवण्यात आली. मेडिकल दुकानदार यांच्याकडून प्रिस्किप्शन कोणत्या भागातील डॉक्टरची आहे याचा शोध घेत असतांनाच पोलिसांना एक महिला आपल्या पतीचा शोध घेत असल्याचे समजले. 

या महिलेला बोलावून मृतदेहाची ओळख पटवली असता तो मृतदेह अरमान शेर अली शाह ( वय ४५  रा.आमपाडा ) याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याची हत्या कोणी केली या बाबत शोध घेत असताना हत्या झालेल्या व्यक्तीच्या पत्नीचे ती काम करीत असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या मोहम्मद सलमान अब्दुल मुकीद शेख या सोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आलेय मयत व्यक्तीने ती काम करीत असलेल्या ठिकाणी जाऊन मालकास या बाबत सांगत सलमान यास जाब विचारला होता. त्याचा राग मनात ठेवून त्याने आपले सहकारी तस्लिमा हलीम अन्सारी व चांदबाबु उर्फ बिलाल सईद अन्सारी यांच्या मदतीने अरमान शेर अली शाह यास फसवून नेत त्यावर हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली.

अवघ्या ४८ तासांत अटकया घटनेत कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी या हत्येच्या गुन्ह्यातील मृतदेहाची ओळख पटवीत हत्या करणाऱ्या आरोपींना अवघ्या ४८ तासात अटक केली. गुन्ह्याचा उलगडा निजामपुरा पोलिसांनी केला असून या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता २८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी