शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : व्हिडीओमध्ये मित्रच मुलीवर बलात्कार करताना दिसला, वडिलांनी आरोपीला क्रूर शिक्षा देत बदला घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 16:31 IST

Crime News:

मॉस्को - एका व्यक्तीने त्याच्या आठ वर्षांच्या निरागस मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना रशियामध्ये घडली आहे. (Crime News) या बलात्कार प्रकरणातील आरोपी हा हत्या करणाऱ्या व्यक्तीचा मित्र होता. सदर व्यक्तीने त्याच्या मुलीवर बलात्कार हो असतानाचा व्हिडीओ मित्राच्या मोबाईलमध्ये पाहिला होता. त्यानंतर त्याने या मित्राची चाकूने भोसकून हत्या केली. (In the video, a friend was seen raping a girl, The father took revenge by killing the accused)

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार रशियामधील रॉकेट इंजिन कारखान्यातील कर्मचारी असलेला ३४ वर्षीय व्याचेस्लाव गावामध्ये आपल्या ३२ वर्षीय मित्र ओलेग स्विरिडोव्ह याच्यासोबत मद्यप्राशन करत होता. या दरम्यान, व्याचेस्लाव्हने अचानक ओलेग याचा मोबाईल घेऊन सर्च करण्यास सुरुवात केली. .या मोबाईलमध्ये कथितपणे ओलेग आणि त्याच्या मुलीचा व्हिडीओ सापडला. .या व्हिडीओमध्ये ओलेग हा त्याच्या मुलीवर बलात्कार करत असल्याचे व्याचेस्लाव्हला दिसले. तो व्हिडीओ पाहून व्याचेस्लाव्हच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यानंतर ओलेगसोबत त्याची वादावादी सुरू झाली. मात्र संधी पाहून ओलेग तिथून पसार झाला.

दरम्यान, व्याचेस्लाव्हने पोलिसांकडे धाव घेत संपूर्ण प्रकार कथन केला. तसेच ओलेग स्विरिडोव्हविरोधात मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. तसेच तो स्वत:ही ओलेगचा शोध घेऊ लागला. दरम्यान, व्याचेस्लाव्हला ओलेग सापडला. तेव्हा दोघांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. त्यानंतर व्याचेस्लाव्हने ओलेगची चाकूने भोसकून हत्या केली. पोलिसांना ओलेगचा मृतदेह गावाजवळील जंगलामध्ये सापडला.  आता पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून व्याचेस्लाव्हला ताब्यात घेतले आहे. तसेच पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, ओलेगच्या मोबाईलमध्ये अजून अनेक मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडीओ होते. त्यामुळे मित्राची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या आरोपी वडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येऊ नये. कारण आरोपीने त्याचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तो खुनी नाही आहे. त्याने आपल्या आणि आमच्या मुलांचे रक्ण केले आहे. प्रत्येक जण त्याच्या बाजूने आहेत. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होता कामा नये, असे एका व्यक्तीने सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrussiaरशियाInternationalआंतरराष्ट्रीय