शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: आठ वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार

By प्रदीप भाकरे | Updated: March 3, 2023 14:19 IST

Crime News: आठ वर्षीय चिमुकल्यावर एका नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा अश्लाघ्य प्रकार गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हददीत उघडकीस आला. १ मार्च रोजी दुपारी १ ते ६.३० या कालावधीत तो प्रकार घडल्याची तक्रार पिडितच्या पालकांनी नोंदविली.

- प्रदीप भाकरे अमरावती: आठ वर्षीय चिमुकल्यावर एका नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा अश्लाघ्य प्रकार गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हददीत उघडकीस आला. १ मार्च रोजी दुपारी १ ते ६.३० या कालावधीत तो प्रकार घडल्याची तक्रार पिडितच्या पालकांनी नोंदविली. त्यावरून पोलिसांनी पंकज लोणावरे (रा. बजरंगनगर) या संशयिताविरूध्द अनैसर्गिक अत्याचार व चुकीच्या कृ्त्य करण्यासाठी बळजबरीने थांबविण्याचा गुन्हा दाखल केला.

गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा एक आठ वर्षीय चिमुरडा १ मार्च रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास खेळून घरी परतला. त्यावेळी काही मुले देखील त्याच्यासोबत त्याच्या घरी आली. त्यावेळी भेदरलेल्या स्थितीत असलेल्या पोटच्या गोळ्याला नेमके काय झाले, तो असा का, अशी विचारणा पालकांनी त्याच्या सोबत आलेल्यांना केली.

त्यावेळी पिडित चिमुरड्याच्या एका मित्राने घटना विषद केली. आम्ही पतंग खेळत असताना पंकज नामक इसम आमच्याकडे आला. त्याने पिडित मुलाला त्याच्या मोबाईलमध्ये गेम लावून दिला. चिमुरड्याच्या तोंडाला रुमाल लावून एका घरात नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. हा सर्व घटनाक्रम ऐकून पिडितचे पालक आरोपीच्या घरी गेले. मात्र तो तेथे आढळून आला नाही. मात्र आरोपीचे नाव पंकज लोणावरे असे असल्याची माहिती त्यांना आरोपीच्या शेजाऱ्यांकडून मिळाली. याबाबत २ मार्च रोजी पहाटे २.४५ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती