शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

crime News: लुटमार प्रकरणातील तीन संशयित ताब्यात, दहा लाख लंपास, व्यापाऱ्याला लुटून केला प्राणघातक हल्ला

By रवींद्र चांदेकर | Updated: August 18, 2022 19:50 IST

Crime News: माहूर तालुक्यातून किराणा मालाच्या रकमेची वसुली करून परतणारे व्यापारी अनिल शर्मा यांना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खडका पुलावर लुटण्यात आले होते. हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पैशाची बॅग लंपास केली होती

- रवींद्र चांदेकर  यवतमाळ : माहूर तालुक्यातून किराणा मालाच्या रकमेची वसुली करून परतणारे व्यापारी अनिल शर्मा यांना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खडका पुलावर लुटण्यात आले होते. हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पैशाची बॅग लंपास केली होती. या प्रकरणातील तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अनिल शर्मा माहूर तालुक्यात वसुलीसाठी गेले होते. तेथून परत येत असताना खडका फाट्यानजीक त्यांची दुचाकी आरोपींनी अडविली. त्यांच्या जवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र शर्मा बॅग देत नसल्याचे बघून आरोपींनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्त्याराने जीवघेणा हल्ला केला होता. यात शर्मा गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांची जवळपास दहा लाख रुपये असलेली बॅग घेऊन पोबारा केला होता.

जखमी अवस्थेत शर्मा जवळपास एक किलोमीटर अंतर चालत गेले. दरम्यान त्यांना तातडीने प्रथम पुसद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर बुधवारी रात्रीच नागपूर येथे हलविण्यात आले. तेथे गुरुवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेनंतर बुधवारी सायंकाळीच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नाकाबंदीचे आदेश दिले होते. दरम्यान महागाव पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणातील तीन संशयितांना ताब्यात घेतले. तत्पूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. नॅशनल हायवे लगतच्या सीसीटीव्ही फुटेजचीही पोलिसांनी पाहणी केली. या प्रकरणा एकूण सात जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तीन संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.रविवारी बाजारपेठ बंदया घटनेमुळे हादरलेल्या व्यापाऱ्यांनी महागावची बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी व्यापारी महासंघाने तहसीलदारांना निवेदन दिले. त्यातून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. दरम्यान महागावचे ठाणेदार विलास चव्हाण यांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी पाच पथके रवाना केल्याचे सांगितले. लवकरच उर्वरित आरोपींना पोलीस अटक करतील, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.तीन संशयितांना स्थानिक पोलीस व एलसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे. अद्याप काही आरोपींना अटक करणे तसेच लुटीतील रक्कम जप्त करणे बाकी आहे. - प्रदीप पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी