शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: एमजीएम दंत महाविद्यालयात रॅगिंग;चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल 

By वैभव गायकर | Updated: September 11, 2022 15:17 IST

Crime News: कामोठे येथील एमजीएम दंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचे त्याच महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी  रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

- वैभव गायकर पनवेल : कामोठे येथील एमजीएम दंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचे त्याच महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी  रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.महाविद्यालयातील अँटी रॅगिंग कमिटीने या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर त्यात तथ्य असल्याचे आढळून आल्यानंतर कमिटीने, रॅगिंग करणाऱ्या चार विद्यार्थ्यांविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीनुसार पोलिसांनी या चार विद्यार्थ्यां विरोधात महाराष्ट्र छळवाद प्रतिबंध अधिनियम १९९४ (४) नुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणात रॅगिंग झालेला विद्यार्थी महाविद्यालयात हॉस्टेलमध्ये राहतो. त्याच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी ऑगस्टमध्ये या विद्यार्थ्याचे रॅगिंग केले होते. या प्रकारामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या या विद्यार्थ्याने पालकांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्याच्या आईने महाविद्यालयातील अँटी रॅगिंग कमिटीकडे तक्रार केली.

तसेच, माझ्या मुलास पॅनिक अटॅक येत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या कमिटीने रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्यांची चौकशी करून त्याच्याकडून रॅगिंगसंदर्भात माहिती घेतली. त्यानंतर रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांसमोर चौकशी केली होती. या विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्याचे रॅगिंग केल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी त्या खोलीत असणाऱ्या इतर दोन विद्यार्थ्यांचादेखील या प्रकरणात सहभाग असल्याचे आढळून आले. यानंतर या महाविद्यालयाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमार्फत हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी