शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! मध्यरात्री व्यायाम करताना आई ओरडली; संतापलेल्या मुलाने डंबेल्सने तिची हत्या केली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 14:34 IST

Crime News : आईला वाचवण्यासाठी आलेल्या बहिणीवरही तरुणाने जीवघेणा हल्ला केला आणि जखमी केलं.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका मुलाने रागाच्या भरात आपल्या जन्मदात्या आईचीच हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री व्यायाम करताना आईने हटकल्याने संतापलेल्या मुलाने तिची हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. याचवेळी आईला वाचवण्यासाठी आलेल्या बहिणीवरही तरुणाने जीवघेणा हल्ला केला आणि जखमी केलं. तेलंगणातील हैदराबादच्या सुलतान बाजार परिसरात सोमवारी ही घटना घडली. कोंडा सुधीर कुमार असं या आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कोंडा सुधीर कुमार हा मानसिक आजारी आहे. तो रात्रीच्या दोन वाजता डंबेल्सने व्यायाम करत होता. त्याच्या आईने त्याला व्यायाम करताना पाहताच ती त्याला ओरडली. आई कोंडा पापम्मा हिने त्याला हटकलं. यामुळे संतापलेल्या सुधीरने डंबेल्सने मारहाण करत तिची हत्या केली. तो आईला मारत असताना त्याची बहीण आईला वाचवण्यासाठी आली. मात्र, सुधीरने तिच्यावरही जीवघेणा हल्ला केला. या घटनेत आईचा मृत्यू झाला असून त्याची बहीण सुचित्रा बचावली आहे. आरोपी सुधीरला अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

सुधीर हा पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर फूड डिलिव्हरी एजंट म्हणून काम करत होता. मात्र वर्षभरापूर्वी त्याने नोकरी सोडली आणि तो घरीच राहत होता. तपासादरम्यान पोलिसांना कळले की सुधीर हा मानसिक आजारी होता आणि त्याच्यावर अलीकडेच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वडिलांचे निधन झाल्यानंतर गेल्या सात वर्षांपासून तो आई आणि बहिणीसोबत राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTamilnaduतामिळनाडू