शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Crime News: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेप

By सुरेंद्र राऊत | Updated: August 11, 2022 19:43 IST

Crime News: जुन्या वादातून घरासमोर उभ्या असलेल्या युवकाचा चाकूने भोसकून खून केला. या गुन्ह्यातील आरोपीला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला.

- सुरेंद्र राऊतयवतमाळ : जुन्या वादातून घरासमोर उभ्या असलेल्या युवकाचा चाकूने भोसकून खून केला. या गुन्ह्यातील आरोपीला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला.

बबलू विठ्ठलराव डोंगरे (३५, रा. तलावफैल, पंचशील चौक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने २० ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता जुन्या वादातून महेश उर्फ बंटी अनिल गजभिये याचा चाकूने भोसकून खून केला. या घटनेपूर्वी आरोपी व मृतकाचा गांधी चौकात वाद झाला होता. त्यावेळी उपस्थितांनी त्या दोघांचे भांडण सोडविले. हाच राग डोक्यात घेऊन बबलू भटकत होता. त्याला महेश हा घराबाहेर हातपंपाजवळ उभा दिसला. याच संधीचा फायदा घेऊन बबलूने धारदार चाकूने महेशच्या छातीत दोन वार केले. महेशने आरडाओरडा केला असता, त्याची आई व भाऊ घराबाहेर धावून आले. आरोपी बबलूच्या तावडीतून महेशला सोडविण्याचा प्रयत्न केला. यात महेशची आई व मामा यांच्या हातालाही दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या महेशला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर काही तासांतच सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी गुल्हाने यांनी आरोपी बबलू डोंगरे याला अटक केली. सचिन गजभिये याच्या तक्रारीवरून कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करून शुभांगी गुल्हाने यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारी पक्षाने एकूण आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये रमा गजभिये, नितेश गजभिये व डॉ. शुभम मोंढे, घटनास्थळावरील पुरावे ग्राह्य मानून आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच २५ हजार रुपये दंड केला. या दंडाच्या रकमेपैकी २० हजार रुपये मृतकाची आई रमाबाई हिला देण्याचा आदेश दिला आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील ॲड. अरुण ए. मोहोड यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. सचिन तायडे, ॲड. रंजित अगमे, कोर्ट पैरवी कढाणे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय