शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! वाढदिवशीच 3 वर्षांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या; पोत्यात सापडला मृतदेह अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 17:55 IST

Crime News : वाढदिवसाच्या दिवशीच एका तीन वर्षांच्या मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच एका तीन वर्षांच्या मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya pradesh) खंडवा (Khandwa district) जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. चिमुकला दुपारच्या वेळेस आपल्या घराजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. कुटुंबातील लोकं त्याचा शोध घेत होते, मात्र तो सापडत नव्हता. त्यानंतर संध्याकाळी उशीरा त्याचा मृतदेह एका निर्जन ठिकाणी पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

चिमुकल्याचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी मुलाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मुलाच्या शरीरावर जखमेच्या खुणा आहेत, ज्यावरून त्याची निर्घ़ृणपणे हत्या करण्यात आल्याचं समोर येत आहे. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. सध्या मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खंडवा जिल्ह्यातील श्याम कोठारे यांचा तीन वर्षांचा मुलगा अक्षांश कोठारे याचा वाढदिवस होता. तो घराभोवती खेळत होता. त्यानंतर तो तेथून अचानक गायब झाला. 

पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

मुलाचे वडील आणि कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात अक्षांश हा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कुटुंबातील सदस्य आणि परिसरातील लोक त्याचा शोध घेत होते. पण रात्री 10 वाजता परिसरातील काही लोक एका निर्जन घरात पोहोचले. जिथे अक्षांशचा मृतदेह एका पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडला, ते पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी देखील वेगाने तपास सुरू केला आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश