शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

Crime News : ३४ वर्षांनी पती भोगणार शिक्षा, उच्च न्यायालयाने हत्या ठरवली सदोष मनुष्यवध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 11:21 IST

पत्नीच्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. १९८८ साली घडलेली ही घटना हत्या नसून सदोष मनुष्यवध आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने पतीची जन्मठेपेची शिक्षा रद्द करून, त्याला सात वर्षांची शिक्षा ठोठावली.

 मुंबई : पत्नीच्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. १९८८ साली घडलेली ही घटना हत्या नसून सदोष मनुष्यवध आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने पतीची जन्मठेपेची शिक्षा रद्द करून, त्याला सात वर्षांची शिक्षा ठोठावली. पती सध्या जामिनावर आहे. सात वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी त्याने दोन आठवड्यात शरण यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.मुंबईत राहणाऱ्या या जोडप्याचा १९८२ साली विवाह झाला. दोघेही बँकेत कामाला होते. १९८३ मध्ये त्यांना मुलगा झाला. त्याला सांभाळण्याची जबाबदारी एका महिलेकडे दिली होती. त्या महिलेकडे मुलाला सोडण्याचे काम पत्नीचे होते, तर तिच्याकडून आणण्याची जबाबदारी पतीची होती. एकदा मुलाला न आणल्याच्या रागात पती-पत्नीमध्ये वाद झाला. पतीने पत्नीला मारहाण केली आणि घरातून तो निघून गेला. पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. पती पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर काही वर्षांनी तो पोलिसांना शरण आला. हत्येसाठी मी जबाबदार नाही, असा दावा पतीने केला.पती वारंवार दौऱ्यावर असायचा. कदाचित त्याला पैशांची गरज लागत असेल; पण वादातून ही हत्या झालेली नाही, असे नमूद करत उच्च न्यायालयाने पतीची जन्मठेप रद्द करत सात वर्षांची शिक्षा ठोठावली.

टॅग्स :Courtन्यायालय