शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: ठाण्यात काेकेन तस्करीप्रकरणी आणखी एका आफ्रिकन आराेपीला अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: August 11, 2022 22:45 IST

Crime News: आफ्रिकन देशातून मुंबईत कोकेनच्या तस्करीसाठी आलेल्या कोफी चार्लस ऊर्फ किंग (सध्या रा. साकीनाका, मेट्रो स्टेशन, मुंबई) याच्यापाठाेपाठ त्याचाच आणखी एक साथीदार चुकवू फिलीप गाॅड विन ऊर्फ क्रेझ यालाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- जितेंद्र कालेकर ठाणे : आफ्रिकन देशातून मुंबईत कोकेनच्या तस्करीसाठी आलेल्या कोफी चार्लस ऊर्फ किंग (सध्या रा. साकीनाका, मेट्रो स्टेशन, मुंबई) याच्यापाठाेपाठ त्याचाच आणखी एक साथीदार चुकवू फिलीप गाॅड विन ऊर्फ क्रेझ यालाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्या ताब्यातून पाच लाख ६० हजारांचे १४ ग्रॅम कोकेन आणि राेकड असा पाच लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दाेघांकडून आतापर्यंत ११६ ग्रॅम वजनाचे ४६ लाख ४० हजारांचे काेकेन जप्त केले आहे.

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ज्ञानेश्वरनगर भागातील हिंदुस्थान रेसिडेंसी हॉटेल, येथे कोकेन या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या कोफी याला वरिष्ठ पाेलीस निरीक्षक विकास घाेडके, सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे आणि अविनाश महाजन, आदींच्या पथकाने ३ ऑगस्टला सापळा लावून अटक केली. त्याच्या ताब्यातून सुरुवातीला २४ लाखांचे ६० ग्रॅम काेकेन त्यानंतर २२ लाख ८० हजारांचे ५६ ग्रॅम कोकेन जप्त केले हाेते. त्याच्याकडून आतापर्यंत ४६ लाख ८० हजारांचे कोकेन हस्तगत केले आहे. दरम्यान, त्याच्याच सखाेल चाैकशीत त्याचा साथीदार क्रेझ याचे नाव समाेर आले. त्यालाही ठाण्यातून या पथकाने १० ऑगस्टला रात्री आठ वाजता अटक केली. या दाेघांकडून आतापर्यंत ११६ ग्रॅम वजनाचा ४६ लाख ४० हजारांचे काेकेन, सहा हजार ४२० रुपयांचा माेबाईल आणि काही राेकड असा ४६ लाख ४६ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. क्रेझ याला १६ ऑगस्टपर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक