शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Crime: ड्रग्जची अमेरिकावारी रोखली, धुळे येथून मुंबईला रवाना केलेले कोट्यवधींचे ड्रग्ज एनसीबीने केले जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 09:21 IST

Crime News: धुळे ते मुंबई अन् मुंबई ते अमेरिकेला निघालेले जवळपास एक कोटींचे ड्रग्ज पार्सल जप्त करण्यास  केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाला  (एनसीबी) यश आले आहे.

मुंबई : धुळे ते मुंबई अन् मुंबई ते अमेरिकेला निघालेले जवळपास एक कोटींचे ड्रग्ज पार्सल जप्त करण्यास  केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाला  (एनसीबी) यश आले आहे. आठवडाभरात त्यांनी ही कारवाई केली आहे. आरोपींकडून ट्राॅमाडाॅलच्या एक किलो वजनाच्या ३ हजार ८४० गोळ्या, एनट्राझेपामच्या १०.०८ किलो वजनाच्या १३ हजार ५०० गोळ्या, उच्च प्रतीचा १९ किलो गांजा, ०१ हजार १५० हायड्रोपोनिक विड जप्त करत ड्रग्ज तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत ड्रग्ज तस्करीतील प्रमुखांसह त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. 

एनीसीबीच्या मुंबई विभागाचे प्रमुख अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आठवडाभर मोहीम राबविली. एका आंतरराष्ट्रीय सिंडिकेटने मुंबईहून यूएसएला कुरिअर पार्सलद्वारे ट्राॅमाडॉल गोळ्यांची अवैध तस्करी करण्याची योजना आखली असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या पथकाने मुंबईतील एका कुरिअर कार्यालयावर १० नोव्हेंबरला छापेमारी करून ट्राॅमाडाॅलच्या गोळ्या जप्त केल्या.

पुढे एनसीबीने धुळ्याहून मुंबईला ड्रग्ज वाहतूक करण्याचा कट रचणाऱ्या आंतरराज्यीय गांजा तस्करांचा पर्दाफाश केला. पथकाने ११ नोव्हेंबरला मुंबईतील एका बस स्थानकाभोवती सापळा रचून वाहक बसखाली उतरताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या सामानाच्या झडतीमध्ये एनसीबीला १९ किलो वजनाचा उच्च प्रतीचा गांजा सापडला. आंध्र प्रदेश-ओडिशा येथून हा गांजा तस्करी करून आणण्यात आला होता. एनसीबीने अटक केलेले दोन्ही वाहक हे गेल्या चार ते पाच वर्षांपासून ड्रग्ज तस्करीमध्ये सक्रिय आहेत. 

  एनसीबीला उच्च दर्जाच्या हायड्रोपोनिक वीडची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटची माहिती मिळाली.  दोहा, कतार येथे कुरिअरद्वारे ही ड्रग्ज तस्करी करण्यात येणार होती. आंतरराष्ट्रीय शिपमेंट अपलोड होण्याच्या मार्गावर असतानाच तपासणीसाठी थांबविण्यात आली.   १४ नोव्हेंबरला एनसीबीने केलेल्या या कारवाईत त्यांना धार्मिक संदर्भ असलेल्या फोटो डेकोरेशन फ्रेम्समध्ये लपविलेला ०१.१५० किलो उच्च दर्जाचा हायड्रोपोनिक गांजाही  जप्त करण्यात यश आले.   एनसीबीने  १५ नोव्हेंबरला या  नायट्राझेपम गोळ्यांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या  प्रमुखासह प्राप्तकर्त्याला मुंबईतून अटक केली.   दुचाकीवरून या गोळ्या आणून देताच एनसीबीने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. या दोघांजवळून एनसीबीने १०.०८ किलो वजनाच्या १३ हजार ५०० गोळ्या जप्त केल्या आहेत. तर, या दोघांच्या चाैकशीतून आणखी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. त्यानुसार, अटक केलेल्या आरोपींकडे अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थMumbaiमुंबईNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो