शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालय क्रेडिट सोसायटीच्या तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 09:39 IST

हजेरीत हेराफेरी करत ६३ लाख लाटले

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दि महाराष्ट्र मंत्रालय क्रेडिट को. ऑप सोसायटीच्या तत्कालीन संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांसह २६ जणांविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. बायोमेट्रिक हजेरीत हेराफेरी करत ६३ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

डोंबिवलीचे रहिवासी असलेले चार्टर्ड अकाऊंटंट मोहन शंकर मोहिते (६२) यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवत पोलिस अधिक तपास करत आहे. आरोपानुसार, १ एप्रिल २०२२ ते २५ जुलै २०२२ दरम्यान ही फसवणूक झाली. संस्थेत कार्यरत असलेले तत्कालीन संचालक मंडळ आणि अन्य आरोपींनी मिळून संस्थेच्या बायोमेट्रिक हजेरी मशीनमध्ये बनावट नोंदी केल्या. त्याबद्दल जास्तीचा कामकाज भत्ता घेत ६३ लाख ३३ हजारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

२६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल प्रकाश सिद्धप्या डांगे, प्रकाश दगू खांगळ, मोहन बापू गोरे, विजय अपराध, शांताराम कांबळे, प्रताप सकपाळ, कृष्णदेव सोनवणे, किशोर खटावकर, अनंत शंकर दळवी, रामचंद्र गोपाळ तावडे, सुशील रामचंद्र तावडे, सुनील कृष्णाजी चव्हाण, वैशाली राजेश सांवत, विठ्ठल जिजावा घुले, ईश्वर जयराम सोनार, मधुसूदन कमलाकर राणे, अपिता अमृत मंत्री, रीना अमित राणे, रंजिता जितीन पाटील, सुमन संदीप दळवी, राहुल वसंत तावंडे, अमित प्रकाश खांगळ, लक्ष्मीकांत रवींद्र जोगल, पिटू दुधनाथ शर्मा, प्रमोद गणपत सावंत, संकेत दिलीप ढवण यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी