शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

खंडित वीजपुरवठा परस्पर जोडल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 00:33 IST

वारंवार विनंती करूनही महावितरणच्या कल्याण परिमंडळात वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सध्या सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : थकबाकीपोटी खंडित केलेला वीजपुरवठा परस्पर जोडून वीजवापर करणे महागात पडू शकते. परस्पर वीज जोडल्याबद्दल महावितरणने नुकताच मुरबाड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. थकीत वीज बिलामुळे खंडित केलेला वीजपुरवठा परस्पर जोडू नये किंवा इतर ग्राहकांकडून तो घेऊन विजेचा वापर करू नये, असे प्रकार आढळल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महावितरणने दिला आहे.वारंवार विनंती करूनही महावितरणच्या कल्याण परिमंडळात वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सध्या सुरू आहे. यात शहापूर उपविभागातील खर्डी व कसारा येथील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला होता. शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कट्टकवार, सहायक अभियंता हेमंत गायकवाड व त्यांच्या पथकाने केलेल्या पडताळणीत खर्डी व कसारा येथील दोन ग्राहकांनी पैसे न भरता वीजपुरवठा परस्पर सुरू केल्याचे आढळले. अरुण तुळशीराम भोईर व एस.के. एज्युकेशन ट्रस्ट, अशी या वीज ग्राहकांची नावे असून, त्यांच्याविरुद्ध खंडित वीजपुरवठा परस्पर जोडल्याप्रकरणी वीज कायदा-२००३ नुसार गुन्हा दाखल केल्याचे महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. अशी कारवाई टाळण्यासाठी विहित मुदतीत वीज बिलाचा भरणा करून अखंडित वीजसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.