शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हेडफोन न दिल्याच्या कारणावरून मामेभावाने केली आतेबहिणीची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 20:27 IST

Cousin Brother brutally kills his sister : नेहा नंदलाल यादव (वय २० वर्ष) व तिचाच मामेभाऊ ऋषिकेश उर्फ बॉबी राममोहन यादव हे शेजारी शेजारी राहतात.

ठळक मुद्दे ऋषिकेश उर्फ बॉबीने आतेबहीण नेहाच्या पोटात धारदार चाकूने वार केले.तिचा जागेवरच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरक्षण रोडवरील माधवनगर येथील रहिवासी असलेल्या २० वर्षीय आतेबहिणीची तिच्याच मामेभावाने हेडफोन न दिल्याच्या कारणावरून पोटात धारदार चाकू भोसकून हत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या हत्याकांडातील आरोपीस खदान पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या हत्येचे नेमके कारण काय आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

माधवनगर येथील रहिवासी नेहा नंदलाल यादव (वय २० वर्ष) व तिचाच मामेभाऊ ऋषिकेश उर्फ बॉबी राममोहन यादव हे शेजारी शेजारी राहतात. शनिवारी सायंकाळी हे दोघेही घरी असताना त्यांच्यात मोबाइलच्या हेडफोनवरून वाद सुरू झाला. या वादात ऋषिकेश उर्फ बॉबीने संतापात येत आतेबहीण नेहाच्या पोटात धारदार चाकूने वार केले. यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या नेहाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिचा जागेवरच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नेहाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आला आहे. या हत्याकांडाची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख शैलेश सपकाळ, खदानचे ठाणेदार डी. सी. खंडेराव यांच्यासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पंचनामा करून आरोपी ऋषिकेश उर्फ बॉबी यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी नेहाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी