शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

बॉयफ्रेंडची हत्या करून मॉडेलनं पोलिसांना कॉल केला; कोट्यवधी रुपये लपवले मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 15:51 IST

१५ नोव्हेंबर रोजी कर्टनी क्लेनी कोर्टात हजर झाली. बॉयफ्रेंड क्रिस्टियन ओबुमेलीची कथित हत्या केल्यानंतर कर्टनीने पोलिसांनाही कॉल केला.

एका एडल्ट मॉडेलनं तिच्या बॉयफ्रेंडची हत्या केल्याचं प्रकरण अमेरिकेत उघड झालं आहे. या मॉडेलनं एका वेबसाईटवर एडल्ट कन्टेंट पब्लिश करून तब्बल २५ कोटी रुपये कमावले होते. गुन्हा केल्यानंतर तपासावेळी तिच्या संपत्तीचा खुलासा होऊ नये यासाठी मॉडेलने तिच्या बँकेतून बरीच रक्कम तिच्या वडिलांच्या खात्यात ट्रान्सफर केली होती असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले. 

अमेरिकन मॉडेल कर्टनी क्लेनीला तिच्या प्रियकराच्या हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगावा लागला आहे. सोशल मीडियावर तिला कर्टनी टेलर या नावाने ओळखले जाते. तिला ३ एप्रिल रोजी ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर सध्या मानसिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी कर्टनीला पाठवलं आहे. सरकारी वकिलांनी म्हटलं की, २६ वर्षीय कर्टनीने क्रिप्टोकरन्सी ट्रेडर बॉयफ्रेंड क्रिस्टियन ओबुमेलीची हत्या केल्यानंतर, स्वत:च्या वडिलांच्या खात्यात ९.६ कोटी रुपये पाठवले, हा व्यवहार तिने तिची संपत्ती लपवण्यासाठी केला होता.

आधी मारलं, मग पोलिसांना कॉल केला...१५ नोव्हेंबर रोजी कर्टनी क्लेनी कोर्टात हजर झाली. बॉयफ्रेंड क्रिस्टियन ओबुमेलीची कथित हत्या केल्यानंतर कर्टनीने पोलिसांनाही कॉल केला. सुरुवातीच्या तपासात पोलिसांना वाटले की, कर्टनीने सेल्फ डिफेन्समध्ये प्रियकराची हत्या केली. मात्र समोर आलेल्या नव्या पुराव्यांमुळे या प्रकरणाची दिशाच बदलली आहे. कर्टनीवर आता खुनाचा आरोप आहे.

मुलीचे तिच्या रागावर नियंत्रण नव्हतेवकील खलील क्विनन यांनी सांगितले की, सापडलेल्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये तिने करोडो रुपये कमावल्याचे स्पष्ट झाले आहे, ती पळून जाण्याचाही प्रयत्न करत होती. मेसेज आणि इतर गोष्टींच्या तपासणीनंतर हे देखील समोर आले आहे की कर्टनी नेहमीच तिच्या प्रियकराला त्रास देत असे आणि तिने रागावर नियंत्रण ठेवले नाही. मात्र कर्टनीने दावा केला की, तिने स्वसंरक्षणार्थ ओबुमेलीची हत्या केली. तपासादरम्यान, कर्टनीने ओबुमेलीला हिंसक आणि धमकी देणारा व्यक्ती म्हणून प्रतिमा बनवली. परंतु या संपूर्ण प्रकरणात पहिला हल्ला कर्टनीने केला होता. या जोडप्यामधील बिघडलेल्या नात्यासाठी ती देखील जबाबदार होती. तिने रागाच्या भरात ओबुमेलीची हत्या केली.

कर्टनीला अटक करून तिच्याविरुद्ध चौकशी सुरू झाली तेव्हा तिच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाल्याचेही समोर आले. मात्र बचावात कर्टनीचे वकील फ्रँक प्रीटो यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी असल्याचं सांगितलं. मंगळवारी त्यांनी दावा केला की, जेव्हा लास वेगासमध्ये या जोडप्यामध्ये भांडण झाले तेव्हा कर्टनीने सिक्युरिटीला बोलावले होते. पोलिसांच्या कागदपत्रांमध्ये हे नाही. तसेच सरकारी वकिलांनी नुकसानीचे रेकॉर्डिंग सादर केले आहे असं फ्रँक यांनी सांगितले. या खटल्यातील जामीनाबाबतची सुनावणी यापुढेही सुरू राहणार असून, वैद्यकीय परीक्षकांसमोर जबाब होणार आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"