शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

१ प्रेयसी, २ प्रियकर अन्..; दत्तक घेतलेल्या पोरीनेच आईबापाला संपवलं; पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 17:54 IST

निवृत्त कर्मचारी मुन्नालाल (६१) आणि त्यांची पत्नी राजदेवी (५५) हे त्यांची मुलगी कोमल आणि मुलगा अनूपसोबत बारा येथील ईडब्ल्यूएस कॉलनीत राहत होते.

नवी दिल्ली - पैसा, संपत्ती आणि मालमत्ता हव्यासापोटी अनेक लोक असे गुन्हे करतात की ते ऐकून सगळेच हैराण होतात. असेच एक प्रकरण काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आले होते. जिथे एका वृद्ध जोडप्याची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत होते. पण मारेकरी हाती सापडत नव्हते. मात्र जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा पोलिसांसह संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. कारण खून करणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून वृद्ध दाम्पत्याची मुलगी होती. जिने तिच्या प्रियकराच्या माध्यमातून हा गुन्हा केला होता आणि दोघांचे प्रेम फक्त २० दिवसांचे होते.

५ जुलै २०२२, कानपूरसकाळची वेळ होती, जेव्हा कानपूरच्या बारा परिसरातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने खळबळ माजली. पहाटेच्या सुमारास राहत्या घरात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा गळा चिरून आत्महत्या केली. पण ही घटना जितकी भयंकर होती तितकीच त्यामागील कटाची कहाणीही अत्यंत भयानक आहे. ज्यानं लोक हैराण झाले आहेत. 

निवृत्त कर्मचारी मुन्नालाल (६१) आणि त्यांची पत्नी राजदेवी (५५) हे त्यांची मुलगी कोमल आणि मुलगा अनूपसोबत बारा येथील ईडब्ल्यूएस कॉलनीत राहत होते. मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती. तर मुलाचा पत्नीशी वाद झाला असून सून लग्नानंतर लगेचच घरातून निघून गेली होती. दरम्यान, ५ जुलै रोजी सकाळी वृद्ध दाम्पत्य त्यांच्या बेडवर मृतावस्थेत आढळले. कोणीतरी धारदार शस्त्राने दोघांचे गळे चिरले होते. 

या खळबळजनक घटनेच्या तपासादरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले. ज्यामध्ये परिसरात राहणाऱ्या रोहित नावाच्या मुलाचे फोटो दिसत होते, जो रात्री उशिरा संशयास्पदरित्या घटनास्थळावरून जाताना दिसत होता. त्या आधारे पोलिसांनी रोहितला अटक केली. पोलिसांनी रोहितची कठोर चौकशी केली असता आरोपीने त्याने केलेला गुन्हा कबूल केला. पण तपासात पुढे जे काही बाहेर आले ते हैराण करणारे होते. रोहित हा कोमलचा दुसरा बॉयफ्रेंड होता, कोमत ही मृत जोडप्याची मुलगी होती, कोमलचा पहिला बॉयफ्रेंड रोहित खरा भाऊ राहुल होता, जो शिपाई आहे, तो मुंबईत तैनात होता.

घटनेच्या २० दिवस आधी फौजी राहुलने भाऊ रोहित आणि कोमलचं कॉन्फरन्स कॉलवरून बोलणं करून दिले होते. पण हा एक कॉन्फरन्स कॉल भावासाठी आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. रोहित आता त्याचा भाऊ राहुलच्या गर्लफ्रेंडशी लपून बोलू लागला आणि दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले, तर मुंबईत बसलेला पहिला प्रियकर राहुलला याची जाणीवही नव्हती.

दोन्ही भावांसोबत संबंध ठेवणारी कोमल तिच्या आई-वडिलांवर नाराज होती. खरंतर तिला रोहित किंवा राहुल या दोघांपैकी एकाशी लग्न करायचं होतं आणि घरचे लोक या नात्यासाठी तयार नव्हते. कोमलच्या भावाचं घटस्फोटाची प्रकरण चालू होतं आणि भावाच्या घटस्फोट प्रकरणात आई-वडिलांची संपत्ती हाताबाहेर जाण्याची भीती कोमलला वाटत होती. त्यामुळे तिने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या आई-वडिलांसोबतच भावाच्या हत्येचा कट रचला आणि या कटात तिचा पहिला प्रियकर राहुलसह त्याचा भाऊ आणि कोमलचा दुसरा प्रियकर रोहितही सामील झाला.दुहेरी हत्याकांडाने पोलीस एक्शनमोडवर ५ जुलैच्या रात्री रोहितने कोमलसह मिळून वृद्ध दाम्पत्याची हत्या केली, मात्र सुदैवाने कोमलच्या भावाचा जीव वाचला. दुहेरी हत्याकांडानंतरच कानपूर पोलीस एक्शनमोडवर आले होते. पोलीस या प्रकरणाचा कट शोधण्यात व्यस्त होते. या कुटुंबातील चार लोकांपैकी दोन जणांची हत्या झाली होती, उर्वरित दोन लोक बाकी होते. यात वृद्ध दाम्पत्याची मुलगी कोमल आणि मुलगा अनूप उरले होते. तपासादरम्यान पोलिसांना कळले की, कोमलला मुन्नालाल आणि राजदेवी यांनी त्यांच्या एका नातेवाईकाकडून २४ वर्षांपूर्वी दत्तक घेतले होते. म्हणजेच त्यांना मुलगी नव्हती. यामुळेच त्यांनी कोमलला दत्तक घेऊन मोठ्या अभिमानाने मोठे केले. पण एक दिवस त्याची दत्तक मुलगी त्याच्या हत्येचे कारण बनेल हे त्याला फारसे माहित नव्हते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"