शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतरही ३ दिवस उपचार; वाढीव बिलासाठी रुग्णालयाकडून लुटीचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 08:01 IST

नांदेडमध्ये डॉक्टरवर गुन्हा दाखल, मृत्यू प्रमाणपत्रासाठीही मागितले होते पैसे 

नांदेड : कोरोना काळात खासगी रुग्णालयात होत असलेल्या लुटीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. परंतु बिलाची रक्कम येणे बाकी असल्याने मृत्यूनंतरही एका कोरोना रुग्णावर तब्बल तीन दिवस उपचार करण्याचा प्रताप नांदेडमधील गोदावरी हॉस्पिटलने केला आहे. मयताच्या पत्नीने या विषयाचा भंडाफोड केला असून, न्यायालयाच्या आदेशाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मुजामपेठ येथील अंकलेश पवार यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना पत्नी शुभांगी पवार यांनी शहरातील गोदावरी हॉस्पिटलमध्ये १६  एप्रिल २०२१ रोजी  दाखल केले होते. त्यावेळी त्यांच्याकडून अनामत म्हणून ५० हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर सातत्याने त्यांची प्रकृती खालावत असल्याने २० एप्रिल रोजी त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले. त्याच दिवशी  ३५ हजार रुपयांचे इंजेक्शन द्यावे लागणार असून पैसे जमा करण्यास डॉक्टरांनी सांगितले. शुभांगी यांनी पैसे भरण्यासाठी मुदत मागितली होती. २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शुभांगी यांनी रुग्णालयात ९० हजार रुपये जमा केले. त्यानंतर दुपारी १२ वाजता त्यांना अंकलेश पवार यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शुभांगी यांनी मृतदेह आणि उपचाराची कागदपत्रे मागितली; परंतु रुग्णालयाने ती देण्यास नकार दिला होता.

अखेर रुग्णालयाने त्यांच्या पतीचा मृतदेह ताब्यात दिला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर २६ एप्रिल रोजी त्यांना उपचाराची कागदपत्रे देण्यात आली. त्यात अंकलेश पवार यांचे २१ एप्रिल रोजी १२ वाजता निधन झाल्याची नोंद होती. विशेष म्हणजे या तिन्ही दिवसांची बिले लावण्यात आली होती. 

मृत्यू प्रमाणपत्रासाठीही मागितले होते पैसे शुभांगी यांनी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र मागितले असता आणखी ४० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणात शुभांगी यांनी ॲड. शिवराज पाटील लोहगावकर यांच्या मदतीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गोदावरी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल