शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी लॅबमध्ये ३० लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह अन् सरकारी तपासात निगेटिव्ह

By प्रविण मरगळे | Updated: September 24, 2020 13:18 IST

२० सप्टेंबर रोजी डीएम आलोक तिवारी आणि सीएमओ डॉ. अनिल कुमार मिश्रा यांनी एका रुग्णाच्या तक्रारीवरून स्वरूप नगर येथील ज्ञान पॅथॉलॉजी लॅबवर छापा टाकला

ठळक मुद्देएका व्यक्तीच्या तक्रारीवरुन सरकारी अधिकाऱ्यांनी लॅबवर मारला छापा ३० जणांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट सरकारी तपासात आला निगेटिव्ह खासगी लॅबला सरकारकडून सील, चौकशी करण्याचे दिले आदेश

कानपूर – देशभरात कोरोनाचा विळखा वाढत चालला असून आतापर्यंत ५७ लाखांहून जास्त लोक बाधित झाले आहेत. गेल्या २४ तासात ८६ हजाराहून जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९० हजारांच्या वर पोहचली आहे. काही लोकांमध्ये कोणतीच लक्षणं दिसून येत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चाचणी करण्यावर भर दिला जात आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे प्रसिद्ध ज्ञान पॅथॉलॉजी लॅबमध्ये कोरोना नसतानाही पॉझिटिव्ह अहवाल दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या लॅबमध्ये ज्या ३० लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांचा सरकारी लॅबमधील रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या घटनेनंतर प्रशासन जागं झालं असून सीएमओने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

२० सप्टेंबर रोजी डीएम आलोक तिवारी आणि सीएमओ डॉ. अनिल कुमार मिश्रा यांनी एका रुग्णाच्या तक्रारीवरून स्वरूप नगर येथील ज्ञान पॅथॉलॉजी लॅबवर छापा टाकला. युगांडाला जाणाऱ्या त्या रुग्णाने लॅबबद्दल तक्रार दिली होती. त्या रुग्णाने लॅबमध्ये तपासणी केली तेव्हा त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याने दुसर्‍या प्रयोगशाळेतही त्याची चाचणी केली, मात्र त्याठिकाणी रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्याला कोणतीही लक्षणे नव्हती. दोन वेगवेगळे रिपोर्ट आल्याने त्या व्यक्तीने लॅबची तक्रार केली.

स्वत: डीएम जेव्हा तपासणी करायला आले तेव्हा तेथे आढळून आले की बर्‍याच रूग्णांची नावे व पत्ते आणि मोबाइल नंबर चुकीच्या पद्धतीने नोंदवली आहेत. डीएम आलोक तिवारी म्हणाले की, चुकीचे अहवाल देणे, पॉझिटिव्ह रूग्णांचे संपूर्ण पत्ते न लिहणे, चाचणीसाठी जास्त पैसे घेतल्याचं निदर्शनास आल्यानंतर अधिकाऱ्यांनी लॅबला सील केले. एडीएम सिटीच्या देखरेखीखाली तीन सदस्यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली होती, ज्यात दोन एसीएमओचा समावेश होता. या समितीने लॅबची संपूर्ण चौकशी केली.

या चौकशीदरम्यान २० सप्टेंबरच्या तीन दिवसांपूर्वी सर्व कोरोना चाचणी रेकॉर्डची पडताळणी केली. लॅबने ज्या लोकांना पॉझिटिव्ह अहवाल दिले त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. यात ३० कोरोना पॉझिटिव्ह दाखवण्यात आलेल्या व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. अद्याप १२ रिपोर्ट येणे बाकी आहे. याबाबत कानपूरचे डीएम आलोक तिवारी म्हणतात की, ज्ञान पॅथॉलॉजीने कोरोना पॉझिटिव्ह घोषित केलेल्या ३० लोकांकडून पुन्हा नमुने घेण्यात आले. आरटीपीसीआर तपास केला. त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ३० पॉझिटिव्ह सहा दिवसांत निगेटिव्ह होऊ शकत नाहीत. सीएमओला खटला दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पण ज्ञान पॅथॉलॉजीचे संचालक डॉ अरुण कुमार म्हणतात की, तीन दिवसांत पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होऊ शकतात. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लोकांना चाचणी रिपोर्ट देण्यात आला आहे. पुन्हा लोकांचे नमुने घेतले गेले त्यात मानकांचे पालन केले गेले आहे की नाही हे आम्ही सांगू शकत नाही. कदाचित डेटा फीडिंगमध्ये गडबड झाली असावी मात्र रिपोर्टमध्ये त्रुटी राहण्याची शक्यता नाही असा दावा त्यांनी केला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या