शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वादग्रस्त साहिल सय्यदला अटकपूर्व जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:02 IST

सत्र न्यायालयाने अ‍ॅलेक्सिस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलविरुद्ध कट रचण्याच्या प्रकरणातील वादग्रस्त आरोपी साहिल कुरेशी ऊर्फ खुर्शिद सय्यद (३८) याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्या. बी. पी. क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा दणका : अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटलविरुद्धच्या कटाचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने अ‍ॅलेक्सिस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलविरुद्ध कट रचण्याच्या प्रकरणातील वादग्रस्त आरोपी साहिल कुरेशी ऊर्फ खुर्शिद सय्यद (३८) याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्या. बी. पी. क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला.प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये हेमवती तिवारी, नीलिमा जयस्वाल आदींचा समावेश आहे. मानकापूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४९, १८८, २६९, २७०, २७१, ४४८ व ५०६ (२)अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांच्यावरही गंभीर आरोप आहेत. हॉस्पिटलमागे असलेल्या जमिनीसंदर्भात आरोपी साहिल व हॉस्पिटल व्यवस्थापनामध्ये वाद सुरू आहे. त्यातून आरोपींनी हॉस्पिटलविरुद्ध कट रचला. त्यानुसार जून-२०२० मध्ये हेमवती तिवारी सोनोग्राफी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली व सोनोग्राफीसंदर्भात महानगरपालिकेकडे तक्रार दिली. त्यानंतर डॉ. गंटावार यांनी हॉस्पिटलमध्ये धाड टाकून सोनोग्राफी मशीन्स सील केल्या. तसेच, ४ जुलै २०२० रोजी साहिलने हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना ठार मारण्याची व हॉस्पिटलची संरक्षण भिंत बुलडोझरने तोडण्याची धमकी दिली. तसेच, साहिलची एक ऑडिओ क्लीप नुकतीच व्हायरल झाली. त्यात अनेक वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली आहेत. महापौर संदीप जोशी व नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना फसविण्याचा उल्लेख त्यात आहे. परिणामी, विविध प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी साहिलला ताब्यात घेऊन सखोल चौकशी करणे आवश्यक आहे असे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी न्यायालयाला सांगितले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने साहिलला दणका दिला.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर