शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सहजिल्हा निबंधक एसीबीच्या जाळ्यात; ३० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 10:36 IST

साटम याच्या कार्यालयातील टेबलाची झडती घेऊन ५ लाख ६३ हजार ५०० रुपये रक्कमही हस्तगत केली आहे.

अलिबाग : ॲग्रीमेंट फॉर जॉब वर्कच्या काँट्रॅक्ट फाईलसाठी पाच लाख रुपये व एज्युडिकेशनच्या पूर्ण केलेल्या दोन फाईल व पेंडिंग एक फाईल अशा तीन फाईलची अंतिम मागणी नोटीस देण्याकरिता मागितलेल्या ५ लाख ३० हजार लाचेप्रकरणी रायगडचे सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी शैलेंद्र अर्जुन साटम (५२) यांना नवी मुंबई लाचलुचपत विभागाने ३० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. साटम याच्या कार्यालयातील टेबलाची झडती घेऊन ५ लाख ६३ हजार ५०० रुपये रक्कमही हस्तगत केली आहे. नवी मुंबई लाचलुचपत पथकाने ६ जून रोजी रात्री १० वाजता ही कारवाई केली आहे. त्यामुळे जिल्हा निबंधक कार्यालयातील आर्थिक भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. 

तक्रारदार यांच्या, जिल्हा निबंधक कार्यालयात जॉब वर्क कॉन्ट्रॅक्टबाबत आणि एज्युडिकेशनच्या तीन फाईल पेंडिंग होत्या. याबाबत तक्रारदार हे कार्यालयात फेऱ्या मारीत होते. मात्र त्याचे काम पूर्ण झाले नव्हते. कार्यालयातील पेंडिंग फाईलबाबत अंतिम नोटीस देण्यासाठी सहजिल्हा निबंधक शैलेंद्र साटम यांनी तक्रारदार याच्याकडे ३० हजार, तर जॉब वर्क कॉन्ट्रॅक्टसाठी ५ लाखांची लाचेची मागणी ६ जून रोजी केली होती. तक्रारदार आणि साटम यांच्यात बोलणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडे लाचेप्रकरणी तक्रार दाखल केली. 

नवी मुंबई लाचलुचपत पथकाने सापळा रचला. ६ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अलिबागसह जिल्हा निबंधक कार्यालयात तक्रारदार यांच्याकडून एज्युडिकेशनच्या फाईलीबाबत ३० हजार रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले. साटम याच्या कार्यालयाची झडती घेतली असता टेबलामध्ये ५ लाख ६३ हजार ५०० रुपये रक्कम हस्तगत केली. साटम यांना अटक करण्यात आली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण