शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका ॲपवरून महिलांची बदनामी; तिघांवर कारवाई, पोलिसांकड़ून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 08:59 IST

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लब हाउस ॲपवर २ ग्रुपचा मॉडरेटर असलेल्या आकाश सुयाल ऊर्फ किरा एक्सडी (१९) याला कर्नाल येथून ताब्यात घेत त्याला ३ दिवसांची कोठड़ी मिळाली आहे. तो बारावी पास असून मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे

मुंबई :  सुल्ली डील्स, बुली बाई ॲप पाठोपाठ ऑडिओ चॅट ॲप्लिकेशन असलेल्या क्लब हाउस ॲपवरून महिलांची बदनामी केल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत तिघांना अटक केली असून फरीदाबाद आणि कर्नाल येथून ही कारवाई करण्यात आली आहे.मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लब हाउस ॲपवर २ ग्रुपचा मॉडरेटर असलेल्या आकाश सुयाल ऊर्फ किरा एक्सडी (१९) याला कर्नाल येथून ताब्यात घेत त्याला ३ दिवसांची कोठड़ी मिळाली आहे. तो बारावी पास असून मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे तर, जैशनव कक्कड़ (२१) आणि यश कुमार उर्फ यश पराशर (२२) या दोघांना फरीदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. त्यांना ट्रांझिट रिमांडद्वारे ताब्यात घेतले आहे. कक्कड़ हा वाणिज्य शिक्षण घेत आहेत तर यश वकिलीचे शिक्षण घेत आहे. शेरसिंग का पापा, बाइकर गँग ५, pardhan@haryana-aala या नावाने ते क्लब हाउसवर प्रसिद्ध होते, अशी माहिती गुन्हे शाखेचे सह आयुक्त मिलिंद भारांंबे यांनी दिली. @Jaimine या ट्विटर अकाऊंटवर क्लब हाउस ॲपच्या चॅटचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. १६ आणि १९ जानेवारी  रोजी हे व्हायरल झाल्याने सर्व स्तरातून संतापाची भावना व्यक्त करण्यात आली. चौकशीत याचा प्रमुख वक्ता किरा एक्सडी  या आयडीचा असल्याचे स्पष्ट झाले. रझा अकादमीने याबाबत मुंबई पोलिसांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली. १९ तारखेला महिला तक्रारदार पुढे आली. तिच्यासह तिच्या मैत्रिणीच्या फोटोचा वापर करत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले होते. त्यानुसार, गुन्हा नोंदवत सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. ३०० जण ग्रुपमध्ये क्लब हाऊसवरील या ग्रुपमध्ये ३०० जण असल्याचे दिसून आले. क्लब हाउस हे ऑडिओ चॅटवर आधारित एक सोशल नेटवर्किंग ॲप आहे. यामध्ये आवडीच्या विविध विषयांवर आवडीच्या लोकांशी बोलू शकतात किंवा चर्चा करू शकतात. या ॲपला पोलिसांकड़ून पत्र पाठवण्यात येणार आहे. बुली बाई ॲप; आरोपींंची समोरासमोर चौकशीदिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या बुली बाई ॲप तयार करणाऱ्या नीरज बिश्नोई आणि ओंकारेश्वर या दोघांचा ताबा मुंबई पोलिसांनी घेतला आहे. दुसरीकडे याच प्रकरणात अटक केलेला नीरज सिंहला ओडिसामधून मुंबईत आणण्यात येत आहे. विशाल कुमार झा, श्वेता सिंह, मयंक रावतसह  बिश्नोई आणि ओंकारेश्वर या सर्वाची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे.