शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुजा रुग्णालयाच्या क्लार्कला लाखोंचा चुना; SRA मध्ये फ्लॅट देण्याचे आमिष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 06:49 IST

सतत पाठपुरावा केल्यावर २०१९ मध्ये एसआरए कार्यालयास स्थानिकांनी तक्रार केल्याने त्यांना खारमध्ये फ्लॅट देणे शक्य नसून बोरिवलीत घेऊन देतो, असे सांगितले. 

मुंबई - एसआरएत घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत हिंदुजा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याची लाखोंची फसवणूक केली आहे. याप्रकरणी त्यांनी वाकोला पोलिसात धाव घेतल्यावर दुकलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार वैभव कोरगावकर (४४) हे माहीम परिसरात राहतात. ते हिंदुजा रुग्णालयात क्लार्क म्हणून काम करतात. त्यांच्या पत्नीच्या भावाचा मित्र इस्टेट एजंट असल्याने एक फ्लॅट विकत घेण्याचे त्यांनी २०१०मध्ये ठरवले. त्यानुसार १० एप्रिल २०१९ रोजी त्यांनी राजू माळी या एजंटची सांताक्रूझ परिसरात भेट घेतली. तेव्हा त्याने त्यांना खारमधील डॉ. आंबेडकर सीएचएस इमारतीत एसआरए अंतर्गत काम सुरू असून, वनरूम किचन १३ लाख २० हजारांना घेऊन देतो, असे सांगितले. त्यानंतर वैभव यांनी पत्नी, आई आणि वडील यांच्याकडून आर्थिक मदत घेत ही रक्कम त्याला दिली.

माळीने वैभवना ‘ॲनेक्चर २’ आणून दिले, ज्यात त्यांच्या पत्नीचे नाव असल्याने आपल्याला फ्लॅट मिळेल असा विश्वास त्यांना वाटला. मात्र, त्यानंतर वैभव हे माळीकडे सतत फ्लॅटबाबत विचारणा करत होते. तेव्हा पत्नीचे कुठेही घर नसल्याच्या प्रमाणपत्राची मागणी माळीचा साथी संजय पाटील याने केली. सतत पाठपुरावा केल्यावर २०१९ मध्ये एसआरए कार्यालयास स्थानिकांनी तक्रार केल्याने त्यांना खारमध्ये फ्लॅट देणे शक्य नसून बोरिवलीत घेऊन देतो, असे सांगितले. माळीने दाखवलेली बोरिवलीतील इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने तिथे फ्लॅट घेण्यास वैभवने नकार दिला. तसेच त्यांचे पैसेही व्याजासकट परत मागितले. तेव्हा एवढी मोठी रक्कम आता आमच्याकडे नसून, आम्ही थोडी थोडी ती परत करतो, असे उत्तर त्यांनी त्यांना दिले. मात्र, ते पैसे अजूनही दुकलीने परत केले नसल्याने वैभव यांनी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला.

टॅग्स :fraudधोकेबाजी