शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अजब चोराची गजब गोष्ट! चोरीआधी गोदामाच्या शटरला नमस्कार; चोरी पाहून मालक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 21:08 IST

चोरट्यानं ४० लाखांच्या सिगारेट लांबवल्या; चोरी पाहून मालक हैराण

अजमेर: दुकानं सुरू करताना, शटर उघडताना अनेक दुकानदार देवाचं स्मरण करतात. आजचा दिवस चांगला जाऊ दे, भरभराट होऊ दे अशी प्रार्थना दुकानदार परमेश्वराकडे करतात. तशीच काहीशी कृती राजस्थानात एका चोरानं केली आहे. दुकानात शिरण्याआधी चोरट्यानं शटरला नमस्कार केला. त्यानंतर त्यानं आत जाऊन केलेला कारनामा सीसीटीव्हीत पाहून मालकानं डोक्यावर हात मारला.

राजस्थानच्या अजमेरमध्ये शनिवारी रात्री एका गोदामात चोरी झाली. चोरानं शटर उघडताना नमस्कार केला आणि मग चोरी केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली आहे. चोरानं जवळपास ४० लाख रुपयांच्या सिगारेट्स घेऊन पोबारा केला. अजमेरमधल्या अलवर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या श्री नगर रोड परिसरात ही चोरी झाली.पाकिस्तानचा मोठा कट उधळला! शस्त्रास्त्रं, स्फोटकांसह ६ जणांना अटक, दिल्ली पोलिसांची कारवाई

शनिवारी रात्री एक तरुण एका मुलासह गोदामात शिरली. तरुणानं लोखंडी रॉडच्या मदतीनं कुलूप तोडून गोदामात प्रवेश केला. त्यानं सुरुवातीला गोदामाचं काऊंटर तपासलं. गल्ला पाहिला. मात्र त्याच्या हाती फार काही लागलं नाही. त्यानंतर त्यानं सिगारेटच्या कार्टन तपासून पाहायला सुरुवात केली. कार्टनवरील किंमत पाहून चोरट्यानं ते कारमध्ये ठेवले. सर्वात महागड्या सिगारेटचे कार्टनच चोरानं लांबवले. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.