शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत किरकोळ वादातून तरुणावर भर रस्त्यात चॉपर व तलवारीने जीवघेणा हल्ला; थरार कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल ..  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 15:22 IST

नारपोली पोलीस ठाण्यात हल्लेखोराविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी -  किरकोळ वादातून एका २५ वर्षीय तरुणावर भर रस्त्यातच गावगुंडांनी चॉपर आणि तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहरातील चरणी पाडा परिसरात घडली रविवारी आहे. विशेष म्हणजे हल्ल्याचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्याया मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात हल्लेखोराविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. 

             गेनू बांगारे ,मनोज बांगारे, गोपी गिरी, अमित रायत असे अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.  तर अमोल माने ( वय २५) असे हल्ल्यात गंभीर झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंजुरफाटा चरणीपाडा भागात अमोल कुटुंबासह राहतो. रविवारी रात्रीच्या सुमारास अमोल भरधाव वेगाने आपली कार घेऊन जात असताना आरोपीचा समज झाला कि आमच्या जवळून भरधाव  वेगाने कार घेऊन कसा जातो. याच गोष्टीचा  राग मनात धरून या गाव गुंडानी अमोल याच्यावर भर रस्त्यात  चॉपर, तलवारी  व लोखंडी रॉडने अचानक जीवघेणा हल्ला केला.  

          अमोलवर हल्ला केल्याचे पाहून अमोलचे वडील व त्यांचे भाऊ हे त्याला वाचविण्यासाठी आले होते. मात्र त्यांनाही या गावगुंडाने जखमी केले आहे. सध्या अमोलवर भिवंडीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती   गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. नारपोली पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी हल्लेखोरां विरोधात गुन्हा दाखल करून सोमवारी रात्री उशीरा चार हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्याच्या थराराचा व्हिडिओ परिसरातील इमारतीमधून एका नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.