शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टसाठी खोदलेल्या खड्डयात पडून मुलाचा मृत्यू; डोंबिवलीतील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 12:22 IST

सागाव परिसरात राहणारे राजकुमार मौर्य हे एका भंगारच्या दुकानात काम करतात. पत्नी एक मुलगा एक मुलगी अस त्यांचं कुटुंब आहे. मंगळवारी सायंकाळची घटना.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: इमारत बांधकामाच्या ठिकाणी लिफ्टसाठी खोदलेल्या खड्डयात पडून सत्यम मौर्य या 10 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना पुर्वेकडील सागाव परिसरात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची नोंद मानपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

सागाव परिसरात राहणारे राजकुमार मौर्य हे एका भंगारच्या दुकानात काम करतात. पत्नी एक मुलगा एक मुलगी अस त्यांचं कुटुंब आहे. मंगळवारी संध्याकाळी त्यांचा मुलगा सत्यम घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. अंधार पडला तरी सत्यम घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. तासभर त्याचा शोध घेतला परंतू त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. त्यांच्या घराच्या बाजुलाच एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी त्यांनी जाऊन पाहीले असता इमारतीच्या लिफ्टसाठी खोदलेल्या खड्डयात साचलेल्या पाण्यात सत्यमचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

सत्यमला पाण्याबाहेर काढून तत्काळ केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात नेण्यात आले. परंतू तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून निष्काळजीपणा करणा-यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.