शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

रासायनिक कचऱ्याचा साठा सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:32 IST

कोळगाव ग्रामस्थांनी पकडला साठा : रसायनांच्या प्रादुर्भावामुळे गावकऱ्यांना आजार

पालघर : कोळगावच्या जेनेसिस औद्योगिक वसाहतीमधील फेज नंबर ३ येथील एका गोडाऊनमधील सहा खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने जैविक टाकाऊ रासायनिक कचºयाचा साठा लपवून ठेवण्यात आला होता. सोमवारी ग्रामस्थांनी हा साठा पकडून तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

जेनेसिस इंडस्ट्रीमध्ये गाळ्यात जैविक टाकाऊ रसायनांचा साठा अवैधरित्या साठवून ठेवला होता. त्या रसायनांच्या प्रादुर्भावामुळे गावकºयांना उलट्या होणे, चक्कर, मळमळणे अशा आजारांनी ग्रासले होते. या दुर्गंधीचा शोध घेण्याचा प्रयत्न ग्रामस्थ अनेक दिवसांपासून करत होते. परंतु शोध लागत नव्हता. सोमवारी ग्रामस्थांनी या अवैधरित्या साठवून ठेवलेल्या रसायनाचा शोध घेतला. दीड महिन्यांपासून या गोदामातून जैविक रसायनाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ग्रामस्थांना या ठिकाणी रासायनिक द्रव्य भरलेले ३५० ड्रम, शेकडो गोण्या भरलेला कचरा आदी मोठ्या प्रमाणात रसायनांचा साठा आढळून आला. मालकाला ही बाब कळताच त्यांनी सोमवारी सकाळच्या सुमारास येथे असलेला हा घातक कचरा ट्रकच्या सहाय्याने दुसरीकडे हलवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र त्याचवेळी कोळगाव गावाचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत हे रोखले. यावेळी ट्रक चालक आणि तेथे काम करणारे मजूर हे लागलीच पळून गेले. येथे उपस्थित कंपनीचा सुपरवायझर राकेश रॉय हा ग्रामस्थांच्या हाती लागला. राकेश रॉयला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर अजगर अली नामक व्यक्ती याचा सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या सूत्रधाराला पकडल्यास आपल्या कारखान्यातील टाकाऊ जैविक कचरा देणाºया कारखानदारांचे बिंग फुटून या टोळीचा पर्दाफाश होऊ शकतो. तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राजेश नांदगावकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून रसायनांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या रसायनांमुळे जिल्ह्यात प्रदूषणाची मात्रा वाढत जाऊन भूगर्भातील पाणीसाठे प्रदूषित झाले आहेत.लोकांच्या जीवाशी खेळएमआयडीसी तारापूर आणि पालघरमधील काही कारखानदार आपल्या कंपनीतील टाकाऊ जैविक तसेच रासायनिक कचरा नवी मुंबईच्या वेस्ट मॅनेजमेंटमध्ये पाठविण्यासाठीचा लाखो रुपयांचा खर्च वाचवण्यासाठी कचºयाची विल्हेवाट लावणाºया टोळ्यांकडे तो सोपवतात. पैशासाठी लोकांच्या आणि पर्यावरणाच्या जीवाशी हे लोक खेळत आहेत. या टोळ्यांकडे हा कचरा सोपविल्यानंतर तो एखाद्या रस्त्याच्या निर्जन स्थळी अथवा नदी, नाले, शेतात फेकला जातो.