शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीच्या मोबदल्यासाठी कोर्टालाच गंडवलं; ४ वकिलांसह १० जणांवर गुन्हा, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 09:05 IST

या जमिनीचा सुमारे ५४ हजार रुपये मोबदला शासनाकडून करण्यात आला होता. परंतु, त्याचे वाटप झाले नव्हते. मोबदला वाढविण्यासाठी वारसदारांनी महाड येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती

महाड - भूसंपादनाच्या बदल्यात शासनाने न्यायालयाकडे जमा केलेला कोट्यवधींचा मोबदला घेण्यासाठी मृत व्यक्ती जिवंत असल्याचे बनावट कागदपत्रे बनवून न्यायालय व शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला आहे. आंबिवली येथील धरणासाठी करंजाडी येथील भूसंपादनातून हा प्रकार घडला असून, महाड न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चार वकिलांसह एकूण दहा जणांविरुद्ध  महाड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  

जयवंती मिरगळ, नथुराम मिरगळ, सुनील मिरगळ, अनिल मिरगळ, ज्ञानेश्वर मिरगळ, किशोर मिरगळ (सर्व रा. करंजाडी), ॲड. भारत नवाळे, ॲड. रचना थाले, ॲड. प्रिया परांगे व ॲड. हेमंत भगत (चौघे रा. पनवेल)  अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मधुकर मिरगळ यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार महाड न्यायालयाने दि. ३१ ऑगस्टला याप्रकरणी संबंधित चार वकिलांसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीचा प्रकार दि.११ फेब्रुवारी २०१९ ते ३१ ऑगस्ट २०२२ या कालावधीत  घडला आहे. महाड तालुक्यातील आंबिवली येथे होणाऱ्या धरणाच्या कामाकरिता मिरगळ कुटुंबीयांची वडिलोपार्जित जमीन २००५ मध्ये संपादित केली होती. 

मोबदल्याचे झाले नव्हते वाटप या जमिनीचा सुमारे ५४ हजार रुपये मोबदला शासनाकडून करण्यात आला होता. परंतु, त्याचे वाटप झाले नव्हते. मोबदला वाढविण्यासाठी वारसदारांनी महाड येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने २०१७ मध्ये संबंधितांना एक कोटी ३५ लाख रुपये मोबदला देण्याचे आदेश दिले. त्यानुसार शासनाकडून २०१९ मध्ये रक्कम न्यायालयात जमा केली. ती मिळविण्यासाठी बनावट कादगपत्रे तयार करून न्यायालयात सादर केले. 

न्यायालयाचीही  केली फसवणूक दगडू मिरगळ हे मृत झालेले असतानाही त्यांच्या जागी दुसरी व्यक्ती उभी करून खोटे कागदपत्रे करून त्याआधारे खोटे प्रतिज्ञापत्रही सादर केले. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास येताच न्यायालयाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.  याप्रकरणी पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे अधिक तपास करत आहेत. दरम्यान, यातील आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती यावेळी पोलिसांकडून देण्यात आली. दोषींवर नक्कीच कारवाई करू.

टॅग्स :fraudधोकेबाजी