शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

परदेशात नोकरी देतो बहाण्यानं फसवलं; महिलेची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

By धीरज परब | Updated: March 5, 2023 13:42 IST

भारतातील एजेंटने तुला ३ लाख रुपयास विकले असून आत जे काही काम सांगतील ते करावे लागेल असे ओमानी एजंटने सांगितल्यावर महिलेस धक्का बसला.

मीरारोड - परदेशात नोकरीचे आमिष दाखवून आखाती देशातील एजंटला ३ लाखांना विकून फसवणूक केल्याप्रकरणी काशीमीरा पोलिसांनी एक महिला व एक पुरुष अशा दोन एजंटना अटक केली आहे. 

काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील फिर्यादी महिलेस आखाती भागातील ओमान - मस्कत देशात दरमहा ३० हजार पगारावर घरकामाची नोकरी देण्याचे आमिष अशरफ मैदु कैवौरा (४६ )  रा. चैट्टली , तालुका चेराळा, कर्नाटक व नमीता सुनिल मालुसरे (४६) रा. हनुमान मंदीर जवळ, जव्हार भाई प्लॉट, घाटकोपर, मुंबई यांनी दाखवले होते.  ती महिला ओमान - मस्कत देशात कामास गेल्यानंतर तेथील ओमानी एजन्टला भेटली. त्यावेळी भारतातील एजेंटने तुला ३ लाख रुपयास विकले असून आत जे काही काम सांगतील ते करावे लागेल असे ओमानी एजंटने सांगितल्यावर महिलेस धक्का बसला. भारतात परत जायचे असले तर दिलेले ३ लाख रुपये परत करावे लागतील असे एजंटने सांगितले. 

पूर्वी फसगत झालेल्या त्या महिलेने तिच्या ओमान - मस्कत येथील तिचे ओळखीचे व्यक्तीना घडला प्रकार सांगितला. ओळखीच्या व्यक्तींनी तिला १ लाख ६५ हजार रुपयांची मदत केली . ती रक्कम तिने ओमानी एजन्टला देवुन स्वतःची सुटका करुन घेत मायदेशी गाठले.  भारतात परतल्यावर महिलेने काशीमीरा पोलीस ठाण्यात नमिता व अशरफ विरुद्ध फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

 

उपायुक्त जयंत बजबळे व सहायक आयुक्त विलास सानप  यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक संदिप कदम, उपनिरीक्षक सुरज जगताप सह लक्ष्मण पाटील,  इरफान मुलानी, दिपक वारे, सुधीर खोत यांच्या पथकाने तपास करत नमिता व अशरफ या दोघांना १ मार्च रोजी अटक केली .   जगताप हे पुढील तपास करत आहेत .