शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अडवून वाहनांची कागदपत्रे विचारणा-या तोतया पोलिसाला पाठलाग करुन पकडले  

By दिपक दुपारगुडे | Updated: April 15, 2023 19:11 IST

सोलापूर : करकंब-पंढरपूर मार्गावर थांबून पोलिस असल्याचा बहाणा करून वाहन चालकांना दमबाजी करत पैसे उकळणारा तोतया पोलीस समाधान गोरख ...

सोलापूर : करकंब-पंढरपूर मार्गावर थांबून पोलिस असल्याचा बहाणा करून वाहन चालकांना दमबाजी करत पैसे उकळणारा तोतया पोलीस समाधान गोरख मढे (रा. शिर्डी, जि. अहमदनगर) याच्यावर करकंब पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, समाधान मढे याने प्रकाश बनकर (रा. करकंब) यांची १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बार्डीपाटी येथे मोटारसायकल अडवली. याबरोबरच इतर मोटरसायकलींना अडवून लायसन्स व गाडीची कागदपत्रे मागितली. तसेच त्यांना दम देत.. पैसे काढा, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल  म्हणत मोटारसायकल (एम.एच. १७ / सी.क्यू. ३१३८) वरील पुढील बोनेटवर महाराष्ट्र पोलीस लिहिलेले व महाराष्ट्र पोलिसांचा लोगो होता. मागील बाजूस इंग्रजी अक्षरात पोलीस लिहलेले वाहन निदर्शनास आले. 

 समाधान मढे हा बनकर यांना दम देत ए तुझ्या गाडीला नंबर नाही म्हणत त्याने जबरदस्तीने बनकर यांच्या शर्ट व पॅन्टचा खिसा जबरदस्तीने तपासून चोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादी प्रकाश बनकर यांनी ट्रॅफिकचे हवालदार विजय गोरवे व शिपाई सुर्वे यांच्या त्याचा पठलाग करून गाडीसहित जळोली चौक येथे पकडली.त्याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय फुगारे करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस