शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

पीएमसी बँकप्रकरणी एचडीआयएलच्या प्रमोटरवर ईडीकडून दोषारोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 06:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लि. (एचडीआयएल) ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लि. (एचडीआयएल) चे प्रमोटर राकेश वाधवा आणि सारंग वाधवा यांच्यावर विशेष पीएमएलए न्यायालयात सोमवारी दोषारोपपत्र दाखल केले.

ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात सुमारे ७,००० पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. ईडीने वाधवा यांच्यावर प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) च्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.सुरुवातीला या दोघांनाही मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू) अटक केली. त्यानंतर आॅक्टोबर महिन्यात ईडीने या दोघांचा ताबा घेतला.

१६ लाख खातेदार असलेल्या पीएमसी बँकेने मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याने २३ सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (आरबीआय)ने या बँकेवर प्रशासक नेमला. सध्या या बँकेचा व्यवहार प्रशासन पाहत आहे.

बँकेने एचडीआयएलला ६,७०० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. बँकेसंबंधित सर्व नियमांना धाब्यावर बसवून पीएमसी बँकेने एचडीआयएलला कर्ज दिले. गेले काही वर्ष एचडीआयएलने कर्जाचे हफ्ते न दिल्याने बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली. त्यात भर म्हणजे एचडीआयएलही दिवाळखोरीत निघाली. बँकेने खातेदारांची रक्कम वापरल्याचे आरबीआयच्या निदर्शनास आले. त्यामुळे खातेदारांना त्यांच्या खात्यातून रक्कम काढण्यावर आरबीआयने निर्बंध घातले. या निर्बंधाविरोधात खातेधारकांनी अनेक निदर्शने केली व उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केल्या. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. आतापर्यंत या घोटाळ्याप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात पीएमसी बँकेच्या व एचडीआयएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँक