शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्ह्यांचे आव्हान कायम; दाखल गुन्हे ३२३, उकल झाली केवळ २१ गुन्ह्यांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 12:48 IST

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी सायबर गुन्ह्यांसंबंधित ४ हजार ७१८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी ३४६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

मुंबई : सायबर गुन्ह्यांचे वाढते जाळे रोखण्याचे आव्हान यंत्रणांसमोर कायम असल्याचे दाखल गुन्ह्यांच्या उकलीवरून समोर येत आहे. गेल्या दोन महिन्यांत सायबर गुन्हे संबंधित ३२३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापैकी अवघ्या २१ गुन्ह्यांची उकल करत ३२ जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी सायबर गुन्ह्यांसंबंधित ४  हजार ७१८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी ३४६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यात सायबर फसवणुकी संदर्भात २१७० गुन्ह्यांचा समावेश असून त्यापैकी अवघ्या ९३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यापाठोपाठ यावर्षी जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये ३२३ गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये, क्रेडिट कार्ड आणि फसवणुकीचे १०० आणि नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचे सर्वाधिक १६ गुन्हे नोंदविले आहेत. दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत उकल करण्याचे प्रमाण कमी आहे. 

‘बी’चा ‘डी’झाला अन्ओशिवरा परिसरात राहणाऱ्या प्रसिद्ध ज्येष्ठ गीतकाराने गेल्यावर्षी २०  ऑगस्ट रोजी सोहम रॉक स्टार एंटरटेनमेंट वर्सोवा कंपनीसोबत गाण्यांचे साडेएकवीस लाख रुपये देण्याचा करार केला. कराराचे पैसे देण्याबाबत गीतकाराच्या  कंपनीकडून ईमेलद्वारे इन्व्हाईस पाठविले होते. ठगाने याच ईमेलमध्ये ‘बी’ चा ‘डी’ करून संबंधित कंपनीला पाठवून दुसऱ्याच खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. संबंधित कंपनीने विश्वास ठेवून पैसे ट्रान्सफर केले. मात्र, पैसे न मिळाल्याने गीतकाराच्या अकाउंटंटच्या तक्रारीवरून ओशिवरा पथकाने खात्याचा तपशील मिळवून तपास सुरू केला. पैसे ट्रान्सफर झालेल्या खात्यात ११ लाखांची रक्कम असल्याचे समजताच ते खाते गोठवत रक्कम दिली. 

गोल्डन अवरमुळे वाचताहेत पैसे...तक्रारदाराने तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर सायबर पथकाकडून संबंधित खाते तपासले जाते. ती रक्कम कुठल्या बँकेत वळती झाली याची माहिती घेतली जाते. त्यानुसार, ज्या खात्यात पैसे गेले त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून खात्याची माहिती घेत, खात्यात रक्कम शिल्लक असल्याचे समजताच तत्काळ फ्रीझ करण्यात येते. बँकेशी पाठपुरावा करून ती तक्रारदाराच्या खात्यात पुन्हा मिळवून देतात. त्यामुळे नागरिकांनी तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. 

बँकेचे सहकार्य महत्त्वाचेनागरिकांनी कुठलेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खातरजमा करणे गरजेचे आहे. फसवणूक झाल्यास तत्काळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यास गोल्डन अवरमुळे पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते. तसेच बँकांचे सहकार्यही महत्त्वाचे असते.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम