शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

क्लासमध्ये कॉपी करताना पकडले; पालक ओरडतील म्हणून मुलाने गोवा गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 08:03 IST

काही तरी आमिष दाखवून मुलाला पळवून नेल्याची तक्रार कुटुंबाने दिली होती. १४ वर्षांच्या मुलाला क्लासमधील परीक्षेत कॉपी करताना पकडल्यानंतर शिक्षकांनी घरी सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : क्लासमधील परीक्षेत कॉपी करताना पकडल्याचे शिक्षकांनी घरी सांगितले. घरी गेल्यावर आई-वडील ओरडतील म्हणून येथील १४ वर्षांच्या मुलाने पलायन केले होते. या मुलाला नालासोपारा पोलिसांनी गोव्यातून आणून सोमवारी (दि. १०) रात्री कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

काही तरी आमिष दाखवून मुलाला पळवून नेल्याची तक्रार कुटुंबाने दिली होती. १४ वर्षांच्या मुलाला क्लासमधील परीक्षेत कॉपी करताना पकडल्यानंतर शिक्षकांनी घरी सांगितले. घरी गेल्यावर आई-वडील ओरडतील म्हणून तो मुलगा २७ सप्टेंबरला संध्याकाळी  क्लास सुटल्यावर घरी न जाता पळून गेला होता. घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी आजूबाजूला, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याकडे शोध घेतला; पण तो सापडला नाही. अखेर कोणीतरी फूस लावून किंवा आमिष दाखवून त्याला पळवून नेल्याची तक्रार कुटुंबाने २८ सप्टेंबरला दिली होती. पोलीस उपनिरीक्षक तायडे आणि त्यांचे पथक तपास करत असताना ८ ऑक्टोबरला तो मुलगा पुण्याला दिसला होता. पोलिसांनी पुण्याला जाऊन शोध घेतला; पण तो सापडला नव्हता. पाेलिसांनी अधिक तपास केला असता त्याला गाेव्यातून ताब्यात घेतले.

५०० रुपये घेऊन गाठले गाेवामुलाने पुण्यातून एकाकडून ५०० रुपये घेऊन रेल्वेने गोवा गाठले होते. तेथे टीसीने त्याला पकडून मडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. मडगाव पोलिसांनी नालासोपारा पोलिसांना माहिती दिल्यानंतर मुलाला आईवडिलांच्या ताब्यात दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :examपरीक्षा