शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

भाजपच्या नेत्यावर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:29 IST

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री काशिमीरा पोलिसांनी मुनावरविरोधात गुन्हा दाखल केला.

मीरा रोड : भाजपचे स्थानिक नेते सय्यद मुनावर हुसेन याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडिता ३३ वर्षांची असून ती २०१२मध्ये मुनावर याच्या अंधेरी येथील मायक्रॉन सिनेव्हिजनमध्ये नोकरीला लागली. नंतर त्याच्या मीरा रोड येथील मायक्रॉन कन्स्ट्रक्शन कंपनीत ती काम करू लागली. तेथे दोघांचे प्रेमसंबंध जुळले व मुनावरने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. या दोघांच्या संबंधांची माहिती त्याच्या पत्नीला मिळाल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. नंतर फिर्यादीने नोकरी सोडली. त्यानंतरही मुनावर याने पीडितेशी शरीरसंबंध ठेवले. पीडिता मुनावरकडे खर्चासाठी पैसे मागायला गेली असता त्याने तिला मारहाण केली. त्याप्रकरणी तिने पोलिसात फिर्याद दिली होती. पीडितेला समजले की मुनावर याने दुसरे लग्नही केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री काशिमीरा पोलिसांनी मुनावरविरोधात गुुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी