शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

थरारक! नरभक्षक आरोपीनं मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे केले, मग...; कारण ऐकून पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 08:30 IST

ही भयानक घटना अमेरिकेत घडली आहे. याठिकाणी हत्येचा संशयित आरोपी जेम्स डेविड रसेल या ३९ वर्षीय व्यक्तीला अटक केली

सनकी म्हणा अथवा मानसिक रोगी याच्या जाळ्यात अडकलेला व्यक्ती कधी काय करेल याचा नेम नाही. असाच काहीसा हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीनं स्वत:च्या मेंदूवर उपचार करण्यासाठी शेजाऱ्याचा खून केला. ७० वर्षीय शेजारील व्यक्तीची निर्घृण हत्या करत आरोपीने त्याच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे केले आणि ते खाऊ लागला. हा किळसवाणा प्रकार ऐकून तुमच्याही अंगावर काटा आला असेल.

ही भयानक घटना अमेरिकेत घडली आहे. याठिकाणी हत्येचा संशयित आरोपी जेम्स डेविड रसेल या ३९ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या सनकी आरोपीनं ७० वर्षीय डेविड एम फ्लैगेट यांचा जीव घेतला. द सनच्या रिपोर्टनुसार, बोनर काऊंटीचे सरकारी वकील लुई मार्शल यांच्या तक्रारीत आरोपी रसेलवर नरभक्षक असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर संशयित आरोपीच्या घराची झडती घेतली त्याठिकाणी जे पाहिलं त्याने सगळेच हादरले.

संशयित आरोपीच्या घरी पोलिसांना मृत शरीराचे तुकडे आढळले. आरोपीच्या घरात एका माइक्रोवेव ओवन आणि काचेचे भांडे सापडले ज्यात रक्त भरले होते. तर शेजारीच रक्ताने माखलेली बॅग आणि चाकूही पडला होता. बोनर काउंटीचे डिटेक्टिव फिलिप स्टेला जेव्हा पोलिसांच्या टीमसोबत घटनास्थळी पोहचले तिथे त्यांना धक्का बसला. ते म्हणाले की, मृत्यू जेव्हा इतका भयानक असतो तेव्हा खूप वाईट वाटतं. इडाहोमध्ये नरभक्षक असल्याचं हे पहिलं प्रकरण आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने क्लीन अप किटचाही वापर केला.

..म्हणून बनला नरभक्षक

या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपपत्रात म्हटलं आहे की, मृताच्या मनगटाला टेपने बांधलेले होते. टेपच्या खाली रक्ताचा कोणताही मागमूस नव्हता. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, असे केल्याने आपली मानसिक समस्या दूर होईल आणि आपल्याला कोणत्याही डॉक्टरकडे जावे लागणार नाही, असे त्याला वाटत होते. मात्र या भयंकर प्रकारामुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.