शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
3
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
4
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
6
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
8
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
9
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
12
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
13
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
14
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
15
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
16
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
17
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
18
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
19
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
20
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...

UBER 'कस्टमर केअर'ला कॉल करणे पडले महागात; १०० रुपये रिफंडच्या नादात ५ लाख गमावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 15:11 IST

आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, पीडित व्यक्तीचे नाव प्रदीप चौधरी असे आहे.

इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नुकतीच एका व्यक्तीची ५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहेला. दरम्यान, या व्यक्तीकडून उबर (UBER) कॅब राइडसाठी १०० रुपये जास्त आकारले होते. त्यामुळे त्या व्यक्तीने गुगलद्वारे उबर कस्टमर केअर नंबर मिळवून, ते पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न  केला, पण त्या व्यक्तीला गुगलवर मिळालेला  नंबर फेक निघाला. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून ५ लाख रुपये उकळले. 

आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, पीडित व्यक्तीचे नाव प्रदीप चौधरी असे आहे. ते एसजे एन्क्लेव्हचा रहिवासी आहेत. त्यांनी गुरुग्रामला जाण्यासाठी २०५ रुपयांत उबर कॅब बुक केली, परंतु उबरने त्यांच्याकडून ३१८ रुपये घेतले. एफआयआरनुसार, चालकाने चौधरी यांना कस्टमर केअरला फोन करून पैसे परत मिळू शकतात, असे सुचवले होते. प्रदीप चौधरी म्हणाले, "मला गुगलवरून नंबर मिळाला आणि मग राकेश मिश्राशी बोललो. त्याने मला गुगल प्ले स्टोअरवरून 'रस्ट डेस्क अॅप' डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने मला पेटीएम उघडण्यास सांगितले आणि परताव्याच्या रकमेसाठी 'rfnd 112' असा मेसेज  पाठवण्यास सांगितले." 

दरम्यान, सुरुवातीला त्यांनी अतुल कुमारला ८३,७६० रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर ४ लाख रुपये, २०,०१२ रुपये आणि ४९,१०१ रुपये असे व्यवहार केले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पेटीएमद्वारे ३ आणि पीएनबी बँकेद्वारे एक व्यवहार करण्यात आले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ डी अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे, परंतु संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

ही चूक कधीही करू नकाउबर कस्टमर केअरला कॉल करण्यासाठी, फक्त त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जा. कारण गुगलवर अनेक बनावट नंबर उपलब्ध आहेत. अधिकृत वेबसाइटवर दाखवलेली लिंक खरी आहे आणि वापरकर्त्यांना ते कसे संपर्कात राहू शकतात हे स्पष्टपणे सांगते. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी