शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जळालेली तरुणी कृत्रिम श्वासावर  :  मृत्यूशी झुंज सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 20:25 IST

हिंगणघाट येथील भरचौकात पेट्रोल टाकून जाळलेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. डॉक्टरांनुसार तरुणी ३५ ते ४० टक्के जळाली असून तोंडात पेट्रोल टाकून जाळल्याने अंतर्गत अवयव भाजले गेले आहेत.

ठळक मुद्देनागपूरच्या खासगी इस्पितळात उपचार

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : हिंगणघाट येथील भरचौकात पेट्रोल टाकून जाळलेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. डॉक्टरांनुसार तरुणी ३५ ते ४० टक्के जळाली असून तोंडात पेट्रोल टाकून जाळल्याने अंतर्गत अवयव भाजले गेले आहेत. विशेषत: श्वासनलिका जळाल्याने तिला श्वास घेणे कठीण जात असल्याने कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले आहे. पुढील ४२ तास तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर हिंगणघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्यावर उपचार करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहता हिंगघाट पोलिसांनी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नुरुल अमीन, एन्टेन्सिव्हिस्ट तज्ज्ञ डॉ. शीतल चौहान यांच्या देखरेखीखाली कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर डॉ. दीपक कोरे जळीत तज्ज्ञ व प्लास्टिक सर्जन डॉ दर्शन रेवानवार यांनी तातडीने उपचाराला सुरुवात केली.हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, पुढील ४२ तास त्या तरुणीसाठी महत्त्वाचे आहेत. अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिचा चेहरा, मान, डोक्याचा भाग, डावा हात, छाती जळालेली आहे. तिच्या डोळ्यांवरही भाजल्याच्या जखमा आहेत. श्वसननलिका जळाल्याने कृत्रिम श्वासोच्छवास दिला जात आहे. तिचा आवाज, दृष्टी जाईल का, हे अद्याप अधिकृतरीत्या सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले. सोमवारी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, आ. समीर कुन्नावार यांनी रुग्णालयाला भेट दिली. तिच्या प्रकृतीकडे डॉ. रेवानवार यांच्यासह क्रिटीकल केअर डॉ. राजेश अटल, फिजिशियन डॉ. सिद्धार्थ सावजी, ईएनटी सर्जन डॉ. अभय आगाशे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. निनाद गावंडे आदी लक्ष ठेवून आहेत.