शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या घनशामनगरात घरफोडी, १० लाखांचे सोने, रोख लांबविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 20:28 IST

दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास ही घरफोडीची घटना उघडकीस

अमरावती: स्थानिक सातुर्णा रोडवरील घनशाम नगरात चोरांनी भर दुपारी केवळ तासभरात एका घरातील सोन्याचे दागिने व रोख असा एकूण आठ ते दहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास ही घरफोडीची घटना उघडकीस आली.

सराफा बाजारातील भांडे व्यावसायिक हरि प्रेमचंद पुरवार (५५) यांचे घनशामनगरात घर आहे. शुक्रवारी दुपारी हरी पुरवार यांची पत्नी घरी होत्या, तर ते दुकानात गेले होते. दरम्यान दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी काही कामानिमीत्त घराबाहेर गेली असता, चोराने त्यांच्या घरातील मागील दारातून प्रवेश करून त्यांच्या घरातील दोन किलो वजनाची चांदी, १६० ग्रॅमचे सोन्याचे दागिने व ८० हजारांची रोख असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेच्या माहितीवरून राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. श्वान पथक व ठसेतज्ज्ञांची मदत घेण्यात आली.दरम्यान, श्वान हे साईनगर परिसरापर्यंत पोहोचले होते. रात्री उशिरा या घटनेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपायुक्त विक्रम साळी, एसीपी भारत गायकवाड व ठाणेदार मनीष ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :Robberyचोरी