शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

तलवारीने केक कापत होता बर्थडे बॉय, तितक्यात पोलीस आले अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 10:33 IST

पोलिसांना पाहताच मित्र तिथून फरार झाले अन् बर्थडे बॉयला पोलिसांनी धरले

खामगाव (जि. बुलडाणा) : मित्रांसोबत वाढदिवस साजरा करताना, तलवारीने केक कापणे एका बर्थडे बॉयच्या चांगलेच अंगलट आले. तलवारीने केक कापणे आणि नाचगाणे सुरू असतानाच शहर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचवेळी त्याचे मित्र घटनास्थळावरून फरार झाल्याने, बिचाऱ्या एकट्यावरच ‘नको रे बाप्पा’ म्हणत गजाआड होण्याची वेळ आली.स्थानिक बाळापूर फैलातील सुदर्शन गेटजवळ रात्री उशिरा वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापला जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. याआधारे शहर पोलीस घटनास्थळी धडकले असता, रोहन संजय बामनेट (वय १८) चार मित्रांसह वाढदिवस साजरा करताना दिसला. पोलिसांना पाहून चौघांनी घटनास्थळावरून पळ काढला. रोहनला ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्यासह चौघांविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५, भादंवि कलम १८८, २७९, २७०, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१(ब), साथरोग अधिनियम कलम ०३ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. चौघांचा कसून शोध घेतला जात आहे.