शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चुलत्याच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना जन्मठेपेची शिक्षा; सामाईक जमीन वाटपावरून वाद!

By दत्ता यादव | Updated: January 25, 2024 11:32 IST

दुधेबावी, ता. फलटण येथे ४ जुलै २०२० रोजी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली होती.

सातारा : सामाईक जमीन वाटून देत नसल्याच्या कारणावरून चुलत्याचा खून केल्याप्रकरणी दुधेबावी, ता. फलटण येथील सख्ख्या भावांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी जन्मठेप व प्रत्येकी तीन लाख रुपये दंड व दंड न दिल्यास एक वर्ष साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली.अनिकेत हणमंत सोनवलकर (वय २३), शंभूराज हणमंत सोनवलकर (२१), अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. 

दुधेबावी, ता. फलटण येथे ४ जुलै २०२० रोजी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली होती. सामाईक जमिनीचे वाटप करून देत नाही, या कारणावरून ज्ञानदेव महादेव सोनवलकर (४०, रा. दुधेबावी) यांना भाऊ हणमंत, भावजय सुनीता सोनवलकर यांनी शिवीगाळ करून पाइपने मारहाण केली होती. तसेच पुतण्या अनिकेतने कुऱ्हाडीने त्यांच्या दंडावर वार केला होता तर, शंभूराज याने डोक्यात लोखंडी गजाने मारहाण केली होती. यामध्ये ज्ञानदेव यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक नितीन सावंत, उपनिरीक्षक यू. एस. शेख यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्ष ग्राह्य मानून न्यायालयाने अनिकेत आणि शंभूराज या दोघा भावांना जन्मठेप व प्रत्येकी तीन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतील पाच लाख रुपये ज्ञानदेव यांच्या कुटुंबीयांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 

सरकार पक्षातर्फे सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता वैशाली पाटील यांनी काम पाहिले. पोलिस उपअधीक्षक राहुल धस, फलटण ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून साधना कदम व हवालदार बडे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाला पोलिस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक उदय दळवी, सुनील सावंत, हवालदार मंजूर मणेर, शेख, अमित भरते यांनी सहकार्य केले. 

आई-वडील निर्दोषया खून प्रकरणात अनिकेत आणि शंभूराज यांच्या आई-वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यांच्या आई-वडिलांची यातून निर्दोष मुक्तता केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी