राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातून भावोजीच्या वागण्याने नाराज झाल्यावर मेहुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. खरं तर, मेहुणीला अश्लील संदेश पाठवून अवैध संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असे. यामुळे एका विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केली.हे प्रकरण भरतपूरच्या अटलबंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे, जिथे 25 वर्षीय विवाहितेने आपल्या भावोजीला कंटाळून घरात गळफास लावून आत्महत्या केली. मृताने आपल्या भावोजीविरोधात आत्महत्या केल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये केला आहे. या व्यतिरिक्त पोलिसांना मृताच्या मोबाईलमध्ये अश्लील मेसेज आढळले आहेत. जे मृताच्या भावोजीकडून पाठविण्यात आले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मेसेजमध्ये अवैध संबंध ठेवण्याची धमकीही देण्यात आली आहे. या सर्व वस्तुस्थितीच्या आधारे पोलिस तपास करत आहेत. मृताच्या सासर्याने सांगितले की, तिच्या भावोजीला कंटाळून आत्महत्या केली. पप्पू नावाचा माणूस जवळपास वर्षभरापासून आपल्या मेहुणीला त्रास देत होता. मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचे तीन वर्षांपूर्वी इंदिरा कॉलनी येथील रहिवासीशी लग्न झाले होते, त्याला एक वर्षाची मुलगीही आहे. मृताने आपल्या कुटूंबाला याबद्दलही सांगितले होते, असेही सांगण्यात आले. पोलिस अधिकारी सतीश वर्मा यांनी सांगितले की, विवाहित महिला आपल्याच घरात फासावर लटकलेली आढळली,त्यामुळे तिचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सुसाईड नोटच्याआधारे कारवाई केली जाईल.
अश्लील मेसेज करून अवैध संबंध ठेवण्यास भावोजी आणत होता दबाव, अखेर मेहुणीने उचलले टोकाचे पाऊल
By पूनम अपराज | Updated: November 28, 2020 21:02 IST
Suicide : हे प्रकरण भरतपूरच्या अटलबंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे, जिथे 25 वर्षीय विवाहितेने आपल्या भावोजीला कंटाळून घरात गळफास लावून आत्महत्या केली.
अश्लील मेसेज करून अवैध संबंध ठेवण्यास भावोजी आणत होता दबाव, अखेर मेहुणीने उचलले टोकाचे पाऊल
ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मेसेजमध्ये अवैध संबंध ठेवण्याची धमकीही देण्यात आली आहे.