शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये कुंटणखान्यावर धाड, चौघांना अटक; दोन पीडितांची सुटका

By संजय तिपाले | Updated: September 21, 2022 12:48 IST

आंटी, जागामालक ते रिक्षाचालक साखळी होती कार्यरत

बीड: पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून बळजबरीने वैश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या तीन आंटींसह एका एजंटाला पोलिसांनी अटक केली. शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीतील एकनाथनगरात २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता पोलिसांनी कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. यावेळी दोन पीडितांची सुटका करण्यात आली.

शहरातील एकनाथ नगरातील एका घरात कुंटणखाना सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक (गृह) प्रशांत शिंदे, पोलीस अधीक्षकांच्या पथकाचे प्रमुख व सहायक निरीक्षक विलास हजारे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख सुरेखा धस, सहायक उपनिरीक्षक प्रताप वाळके, हवालदार सुरेखा उगले, अंमलदार सतीश बहिरवाळ, विकास नेवडे, शिवदास घोलप, बालाजी बास्टेवाड, राम काकडे यांनी सापळा लावला. डमी ग्राहक पाठवला. त्याच्याकडून आंटीने दीड हजार रुपये घेतले. त्याने बाहेर येऊन इशारा करताच पोलिसांनी धाड टाकली. यावेळी दोन पीडितांची सुटका केली तर तीन आंटींसह एजंट म्हणून काम करणाऱ्या रिक्षाचालकास पकडले. एका आंटीच्याच घरात हा सगळा प्रकार सुरु होता, असे पोलिसांनी सांगितले. शोभा चंद्रकांत बीडकर, दीक्षा राजेश मिरपगार , रेखा विजय चव्हाण, रिक्षाचालक महेश मोहन चांदणे या चौघांविरुध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला.

रिक्षावाला करायचा राखणदरम्यान, यातील एजंट असलेला रिक्षाचालक महेश चांदणे ग्राहकांची व पीडितांची ने- आण करत असे. शिवाय दारासमोर थांबून राखण करण्याचेही काम करायचा. या बदल्यात त्यास एका ग्राहकाने दोन ते तीनशे रुपये मिळायचे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.