शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! ‘शिवचरित्रा’च्या बहाण्याने घरात घुसला अन्..; सुप्रिया शिंदेच्या हत्येचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 08:34 IST

तपासादरम्यान सुप्रियाच्या घराबाहेर विशिष्ट प्रकारच्या चपला दोन वेळेला दिसल्याची माहिती सोसायटीतील रहिवाशांकडून मिळाली.

डोंबिवली : अतिप्रसंगाला विरोध दर्शविल्याने सुप्रिया शिंदे हिला शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या विशाल घावट या तरुणाने ठार मारले आणि तिचा मृतदेह सोफा कम बेडमध्ये कोंबला, असे मानपाडा पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. डोक्यावर प्रहार करून आणि गळा आवळून तिची हत्या झाली होती. तिच्या घराबाहेर दिसलेल्या चपलेवरून हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.दावडी परिसरात राहणाऱ्या  सुप्रियाचा मृतदेह घरातील सोफा कम बेडमध्ये मंगळवारी रात्री आढळला होता. आरोपी सुप्रियाच्या परिचयाचा असावा, असा पोलिसांचा अंदाज खरा ठरला आहे. सुप्रियाचा पती किशोर ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असताना विशाल  किशोरबरोबर होता. परंतु, सुप्रियाचा मृतदेह आढळल्यानंतर तो दिसला नाही. विशालला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

‘शिवचरित्रा’च्या बहाण्याने घरात घुसलासुप्रियाच्या कुटुंबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आस्था आहे. छत्रपतींच्या जीवनावरील पुस्तके वाचली जात होती. ही माहिती विशालला होती. मंगळवारी तिचा मुलगा शाळेत गेल्यावर तो शिवचरित्रचे पुस्तक देण्याच्या बहाण्याने तिच्या घरात घुसला. तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्याने हत्या केल्याचे तपासात उघड झाले.

दोनदा दिसली ‘ती’ चप्पल तपासादरम्यान सुप्रियाच्या घराबाहेर विशिष्ट प्रकारच्या चपला दोन वेळेला दिसल्याची माहिती सोसायटीतील रहिवाशांकडून मिळाली. ज्यावेळी घटना घडली तेव्हाही त्याच चपला घराच्या बाहेर होत्या. अखेर हाच धागा पकडून पोलिसांनी शोध सुरू केला आणि त्या चपला शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या विशालच्या होत्या हे स्पष्ट झाले.