शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर तलाठ्याला पाठलाग करून पकडले, लाचलुचपत विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर : पालघर तालुक्यातील अल्याळी, शिरगावचे तलाठी महेशकुमार जनार्दन कचरे (वय ४६) याला १० हजार रुपयांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर : पालघर तालुक्यातील अल्याळी, शिरगावचे तलाठी महेशकुमार जनार्दन कचरे (वय ४६) याला १० हजार रुपयांची लाच घेऊन गल्लीबोळातून पळत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर वथकाने पाठलाग करून रंगेहाथ पकडले.  जमिनीत केलेल्या फेरफारची महसूल अभिलेखात नोंद करण्यासाठी कचरे याने एका व्यक्तीकडून दहा हजार रुपयाची लाच स्वीकारली होती.

पालघर तालुक्यातील अल्याळी तलाठी कार्यालय क्षेत्रात एका व्यक्तीने जमीन खरेदी केली असल्याने या जमिनीची नोंद अभिलेखात करण्यासाठी महेश कचरे यांनी या नागरिकाकडून १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तडजोडीअंती ही रक्कम १० हजार रुपयापर्यंत देण्याचे ठरले. यासंदर्भात तक्रारदार व्यक्तीने २९  मार्च  रोजी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. याबाबत विभागाने तक्रारीची खातरजमा केल्यानंतर सोमवारी तक्रारदाराला आरोपीने प्रथम अल्याळी येथे बोलावले. नंतर पालघर सर्कल ऑफिस तसेच तहसीलदार कार्यालय असे फिरवून शेवटी तक्रारदाराच्या कारमध्ये बसून ते स्टेशन परिसरात पोहचले.

कारमध्ये बसल्यावर आरोपी तलाठीने लाचेची रक्कम घेऊन डॉ. कांता हॉस्पिटलच्या गल्लीत उतरल्यावर तो पायी जात असताना आपल्या पाळतीवर पोलिस असल्याचा संशय आल्यावर आरोपी पळू लागला.

उपअधीक्षक जखमी

तात्काळ पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोनि. स्वपन बिश्वास, हवालदार विलास भोई, संजय सुतार, योगेश धारणे, निशा मांजरेकर, नवनाथ भगत, दीपक सुमडा आदींनी त्याचा पाठलाग करणे सुरू केले. अनेक हुलकावण्या देत पळून जात असताना मोठ्या शिताफीने आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. या पाठलागादरम्यान उपअधीक्षक जगताप यांना किरकोळ दुखापत झाली.

 

टॅग्स :palgharपालघरBribe Caseलाच प्रकरण