शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक, कारेगावातून घेतले ताब्यात 

By आनंद इंगोले | Updated: October 18, 2023 22:22 IST

अखेर पुणे जिल्ह्यातील रांजनगाव परिसरातील कारेगाव शिवारातून पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

वर्धा : आर्वी तालुक्यातील पारगोठाण येथील एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने वाहनात बसवून निर्जनस्थळी नेत बलात्कार केल्या प्रकरणी आर्वी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. अखेर पुणे जिल्ह्यातील रांजनगाव परिसरातील कारेगाव शिवारातून पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पीडिता १३ आॅक्टोबरला सकाळी रोहणा येथील महाविद्यालयात गेली होती. तिची प्रकृती खालावल्याने ती पारगोठाण येथे बसने पोहचून घराकडे पायदळ जात होती. यावेळी कारमधून आलेल्या मुलांनी तिला अडवूून धमकावित तिला कारमध्ये बसविले. तसेच धनोडी डॅमकडे नेऊन तिला दारु पाजत तिच्यावर आळीपाळींनी अत्याचार केला. अशा तक्रारीवरुन आर्वी पोलिसांनी शुभम उर्फ प्रयोग प्रकाशराव पानबुडे (२९) व  अशपाक अकबर शहा (२०) दोन्ही रा.धनोडी (बहादरपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे दोघेही घटनेपासून फार झाले होते. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेवरुन अप्पर पोलिस अधीक्षक, पुलगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आणि आर्वीचे ठाणेदार यांनी घटनास्थळी जावून परिस्थितीची माहिती घेतली. स्थानिक गुन्हे शाखा व आर्वी पोलिसांच्या पथकाने सामूहिक तपास करुन आरोपीचा यवतमाळ, अमरावती, अकोला येथे जावून शोध घेतला. हे दोन्ही आरोपी चारचाकी वाहनाने पुण्याकडे पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याआधारे पोलिस पथकाने पुण्यात शोध घेतला असता ते कंपणीच्या कामाकरिता रांजनगाव परिसरात गेल्याची माहिती मिळाली. लगेच पोलिसांनी या परिसरात जावून तपास केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनेत वापरलेल्या चारचाकी वाहनाने कारेगाव येथे जाळ्यात अडकले. 

दोघांनाही आर्वी पोलिस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, आर्वीचे ठाणेदार प्रशांत काळे, सहायक पोलिस निरीक्षक धनश्री कुटेमाटे, राम खोत, मनोज धात्रक, संतोष दरगुडे, राजेश तिवसकर, अक्षय राऊत, विशाल मडावी, रामकिसन कास्देकर, निलेश करडे, राहूल देशमुख, शिवकुमार परदेशी यांनी केली. त्यांना पुणे ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या रांजनगाव येथील पोलिसांनी सहकार्य केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी